(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Rakhi Sawant : काहीसं हटके, बोल्ड वक्तव्यासाठी चर्चेत असणाऱ्या राखीने कधीकाळी म्युझिक अल्बममध्येही आपला दबदबा तयार केला होता.
Rakhi Sawant: बी-टाऊनमध्ये आपल्या बेधडक आणि बोल्ड वक्तव्यासाठी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ओळखली जाते. बिग बॉससारखा रिएल्टी शोदेखील तिने चांगलाच गाजवला. त्याशिवाय तिने इतरही रिएल्टी शोमध्ये छाप सोडली होती. आता काहीसं हटके, बोल्ड वक्तव्यासाठी चर्चेत असणाऱ्या राखीने कधीकाळी म्युझिक अल्बममध्येही आपला दबदबा तयार केला होता.
राखी सावंतने 1997 मध्ये अग्निचक्र या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याशिवाय, तिने इतर काही चित्रपटांमध्ये लहान भूमिका साकारल्या. मात्र, तिला ओळख आणि ग्लॅमर म्युझिक अल्बमने मिळवून दिले.
वर्ष 2000 नंतर जुनी गाजलेली गाणी रिमिक्स करुन त्याचे अल्बम लाँच करण्याचा ट्रेंड सुरू झाला होता. या दरम्यान सत्तर-ऐशींच्या दशकात गाजलेली गाणी ही रिमिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. राखी सावंत देखील 'परदेसिया' या गाण्यात दिसली होती. या गाण्यातील तिचे हावभाव आणि नृत्याला लोकांनी चांगलीच दाद दिली होती . या गाण्यानंतर राखीला एक वलय मिळाले. मात्र, तिने या म्युझिक अल्बमसाठी स्वत:चे घर विकून पैसे उभारले होते.
दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने आपल्या एका व्हिडीओत याची माहिती दिली. फराह खान ही व्लॉग ही करते. तिने राखी सावंतसोबतही एक व्लॉग तयार केला. राखीने फराह खानने दिग्दर्शित केलेल्या 'मै हुँ ना' चित्रपटात भूमिका साकारली होती.
राखीने विकले घर...
या व्हिडीओत फराह खान राखीचे कौतुक करताना दिसत आहे. फराह खान म्हणते की, या मुलीने 'मै हुँ ना' रिलीज होण्याआधी मला सांगितले होते की, ती एक म्युझिक अल्बमची निर्मिती करत आहे. त्यासाठी तिने घर ही विकले आहे. त्यावेळी मी तिला हा काय वेडेपणा करतेय असे म्हटले. पण, या मुलीने परदेसिया या गाण्यात कमाल केली आणि एक नवी ओळख मिळवली. त्यावर राखीदेखील शाहरुख खानने ही कौतुक केले होते असे सांगितले.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केलं कौतुक...
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना राखीचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले की, घर विकून राखीने राज महाल सारखं गाणं तयार केले. एकाने म्हटले की, परदेसिया हे गाणं आलं तेव्हा ती अप्रतिम होती. काहींनी राखीचे कौतुक करताना तिलाही आदर, सन्मान मिळायला हवा, असे म्हटले.