Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना आता राजकीय पक्षांनी त्यांच्या बैठक, कार्यक्रमांचा जोर वाढवल्याचं दिसतंय.
मुंबई : बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर पितृ-पंधरवड्याला सुरुवात झाली. पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असे साधारणत: बोलले जाते. राजकारणी देखील याचे तंतोतंत पालन करतात. मात्र असे असले तरी याच कळात राजकीय बैठका आणि राजकीय कार्यक्रमांना मात्र जोर आलेला आल्याचं दिसतंय.
सध्या सर्वांचं लक्ष लागलंय ते राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे. दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील अशी सध्या चर्चा सुरू आहे. याचमुळे सगळे पक्ष कामाला देखील लागलेले आहेत. मात्र सध्या पितृपक्ष असल्यामुळे कोणत्याच पक्षाकडून जरी उमेदवारांची घोषणा केली जात नसली तरी याच पितृ-पंधरवड्यात बैठकांचा जोर मात्र वाढलेला आहे. पितृ पंधरावड्यात नेमका कसा आहे राजकीय पक्षाचा कार्यक्रम हे पाहू,
- भाजपची 23-24 सप्टेंबरला मुंबईत मॅरेथॉन बैठक
- अजित पवार- शिंदे गटाच्याही निवडणुकाच्या अनुषंगाने बैठका सुरू
- महायुतीकडून राज्यात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम
- केंद्रीय सुक्ष्म व लघु मंत्रालयाच्या विश्वकर्मा योजनेचा उद्या वर्ध्यात कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार हजेरी
- महाविकास आघाडीची सलग तीन मुंबईत बैठक
एकीकडे पितृ पंधरवड्यात बैठकांचा जोर वाढलेला असला तरी महत्त्वाचे निर्णय आणि महत्त्वाचे कार्यक्रम पितृपक्षानंतरच घेतले जाणार आहेत. भाजपाच्या पहिल्या 50 उमेदवारांची यादी पितृपक्ष झाल्यानंतर लगेच जाहीर होणार आहे. अजित पवार यांची शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आणि इतर पक्षाच्या उमेदवारांची यादिही पितृपक्षानंतर जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे महत्त्वकांक्षी अशा मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. दरम्यान भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभ असल्याचे सांगत उमेदवार जाहीर करणे हा केंद्रीय बोर्डाचा विषय आहे, ते लवकरच निर्णय घेतील असं वक्तव्य केलं.
एकूणच काय पितृपक्षात बऱ्याच चांगल्या गोष्टी आणि निर्णय घेतले जात नसल्याचे बोलले जाते. मात्र याच काळात यंदा राजकीय बैठका आणि पक्षाचे कार्यक्रम मात्र जोमात असल्याचे चित्र आहे.
ही बातमी वाचा :