(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Appi Amchi Collector : उज्वल निकम आणि विश्वास पाटील घेणार अप्पीची मुलाखत; कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का?
Appi Amchi Collector : उज्वल निकम आणि आयएएस ऑफिसर विश्वास पाटील यांची 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत एन्ट्री होणार आहे.
Appi Amchi Collector Marathi Serial Latest Update : वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. असाच वेगळा विषय असलेली 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) ही मालिका गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता या मालिकेत उज्वल निकम (Ujjwal Nikam) आणि आयएएस (IAS) ऑफिसवर विश्वास पाटील (Vishwas Patil) यांची एन्ट्री होणार आहे.
'अप्पी आमची कलेक्टर'चं संघर्षमय कथानक
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील अपर्णा माने म्हणजेच अप्पी एका छोट्या खेडेगावात राहणारी मुलगी आहे. या खेडेगावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच तिला मार्गदर्शन करणारंदेखील कोणी नाही. पण तिचं ध्येय खूप मोठं आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत अप्पी कलेक्टर होते. तिचे बापू, पती अर्जुन, भाऊ दिप्या तिच्या बाजून ठामपणे उभे आहेत. अशी संघर्षमय कथा 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेची आहे.
View this post on Instagram
'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अप्पीने नुकतीच युपीएससीची (UPSC) परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे आणि आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न साकार होणार आहे. पण यासाठी तिला एक कठीण टप्पा पार करावा लागणार आहे.
उज्वल निकम आणि विश्वास पाटील यांची मालिकेत एन्ट्री
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत उज्वल निकम आणि विश्वास पाटील यांची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत उज्वल निकम आणि विश्वास पाटील अप्पीची मुलाखत घेताना दिसणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने हे दोन ऑफिसर्स छोट्या पडद्यावर प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे कलेक्टर बनण्याचा अखेरचा कठीण टप्पा अप्पी पार करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत शिवानी नाईक अप्पीच्या भूमिकेत आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेचं लेखन अभयसिंह जाधव यांनी केलं असून आशुतोष बाविस्कर दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.
संबंधित बातम्या