![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amit Thackeray: मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
MNS leader Amit Thackeray: आणखी एक ठाकरे विधानसभा लढणार. अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार? अमित ठाकरेंनी 'या' विधानसभा मतदारसंघांमधून रिंगणात उतरवण्याची कार्यकर्त्यांची मागणी
![Amit Thackeray: मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार? MNS chief Raj Thackeray Son Amit Thackeray may contest maharashtra assembly election 2024 Vidhan Sabha Election from Bhandup or Mahim Amit Thackeray: मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/55b22bfd49f19e26b380f89a3e4508331726739980785954_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amit Thackeray: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत.यामध्येच सोमवारी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची मुंबईतील राजगड कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पूत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आपल्याला लोकांसाठी जर काही करायचं असेल तर स्वतः संसदीय राजकारणात यायला हवं असं मनसे नेते आणि सरचिटणीस यांना सांगत मी देखील विधानसभेसाठी तयार आहे अशी तयारी दर्शवली. त्यामुळे आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात येणार या चर्चांना आणि त्यांनी यावं यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी होऊ लागलीये.
अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवताच, ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये अमित ठाकरेंचे बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये अमित ठाकरेंनी याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
अमित ठाकरे यांनी कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची मागणी
मुंबईतील माहीम, भांडुप, दिंडोशी,कलिना, चांदीवली आणि मागाठणे या मतदारसंघांमध्ये अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या मतदारसंघामध्ये मनसेची चांगली ताकद आहे. पक्ष स्थापन झाल्यानंतर या तिन्ही मतदारसंघांमध्ये मनसेचे आमदार निवडून आले होते. या मतदार संघामध्ये मनसेला अजूनही पोषक वातावरण आहे.
राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरणार आहेत.राज ठाकरे यांनी अनेकदा मनाचा मोठे पणा दाखवत काही राजकीय पक्षातील उमेदवारांसाठी मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले नव्हते. यामध्ये राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे वरळी विधानसभेत निवडणुकीसाठी उभे राहिले त्यावेळेला मनसेने तिथे उमेदवार दिला नव्हता. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. समजा अमित ठाकरे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार कोणत्याही मतदारसंघांमध्ये उभे राहिले, तर हाच मोठेपणा इतर पक्ष दाखवतील का हे देखील पुढील काळात पहाणे महत्त्वाचे ठरेल.
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांच्या समर्थनार्थ आहेत, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. यानुसार काही नेते स्वतः अमित ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. त्यानुसार अमित ठाकरे यांना माहीम हा मतदार संघ अधिक सोयीस्कर असून इतर पक्षही या मतदारसंघात त्यांना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित ठाकरे हे विधानसभा लढले तर माहीम मतदारसंघच असेल की दुसरा कोणता हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)