Vanita Kharat: ‘सुंदरी’ मालिकेत वनिता खरातची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, "फायर है तू"
'सुंदरी' (Sundari) या मालिकेच्या प्रोमोमधील वनिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
![Vanita Kharat: ‘सुंदरी’ मालिकेत वनिता खरातची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, maharashtrachi hasyajatra fame vanita kharat entry in sundari marathi serial see look Vanita Kharat: ‘सुंदरी’ मालिकेत वनिता खरातची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/31/5517fba7c9c2d8b3c2ebcf77edb3fd501698744428347259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही आता एका नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच 'सुंदरी' (Sundari) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमधील वनिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सुंदरी या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सुंदरी ही साहेब प्लाझा तोडण्याचा आदेश देते. तेवढ्यात वनिता खरातची एन्ट्री होते. काळी साडी, काळी टिकली आणि ऑक्लाइडचे दागिने अशा लूकमध्ये वनिता दिसत आहे. वनिताचा हा लूक पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की, सुंदरी या मालिकेत ती खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन वनिताला तिच्या या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,"मला वाटतं वनिता खरातने अशाच नवनवीन भूमिका साकारायला हरकत नाही . या मलिकेत ती खलनायकाची भूमिका खुप सुंदर साकारणार आहे, असं प्रोमो पाहून कळत आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "फायर है तू" तसेच सुयश टिळक,पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शिनी इंदलकर यांनी देखील सुंदरी या मालिकेच्या प्रोमोला कमेंट करुन वनिताला तिच्या आगामी मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुंदरी या मालिकेत अभिनेत्री आरती बिराजदार ही प्रमुख भूमिका साकारते. आता सुंदरी या मालिकेत वनिताची एन्ट्री झाल्यानंतर पुढे काय काय घडणार? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
वनिता खरातच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच वनिता ही 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील वनिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. येत्या 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात वनितानं महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, रोहित माने आदि तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत.
संबंधित बातम्या:
Sundari : 'सुंदरी' सांभाळणार देशसेवा अन् आईपणाची जबाबदारी; मालिकेच्या नव्या पर्वाला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)