![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचा मोठा निर्णय; संचालक पदाचा दिला राजीनामा
Madhurani prabhulkar : मधुराणीने मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
![Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचा मोठा निर्णय; संचालक पदाचा दिला राजीनामा Madhurani prabhulkar Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar of aai kuthe kay karte fame has resigned from the post of director know details Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचा मोठा निर्णय; संचालक पदाचा दिला राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/2fdd23bffb54c130986cf3f5bbe7b3821688202094357254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Madhurani prabhulkar : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेच्या माध्यमातून मधुराणी प्रभुलकर (Madhurani prabhulkar) घराघरांत पोहोचली आहे. पण आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मधुराणीने मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
मधुराणी प्रभुलकरने संचालक पदाचा दिला राजीनामा
मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था मधुराणी आणि तिचा पती प्रमोद प्रभुलकर यांनी सुरू केली होती. या संस्थेमार्फत अनेक अनेक कलाकारांना अभिनयाचं प्रशिक्षण दिलं आहे. यात ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर अशा अनेक नामांकित कलाकारांचा समावेश आहे.
अभिनयाच्या प्रशिक्षणासह अनेक कल्पक उपक्रम मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत करण्यात येतात. पण मधुराणी सध्या शूटिंगमध्ये व्यस्थ असल्याने तिने या संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. आता या संस्थेशी तिचा संबंध नसेल.
View this post on Instagram
मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) अभिनेत्री असण्यासोबत गायिका आणि संगीतकारदेखील आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने पहिली एकांकिका लिहिली होती. या एकांकिकेसाठी तिला 'पुरुषोत्तम करंडक' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर तिने मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला. 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमादेखील ती महत्त्वाच्या भूमिकेत होती.
मधुराणी प्रभुलकर आणि प्रमोद प्रभुलकरची लव्हस्टोरी काय आहे? (Madhurani prabhulkar Pramod Prabhulkar Love Story)
मधुराणी प्रभुलकर आणि प्रमोद प्रभुलकर यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. मधुराणी एक अभिनेत्री आहे. तर प्रमोद हा दिग्दर्शक आहे. 'इंद्रधनुष्य' या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. त्यावेळी या मालिकेचं सहाय्यक दिग्दर्शन प्रमोद करत होता. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण? जाणून घ्या त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)