Kushal Badrike , Shreya Bugade : कुशलनं शेअर केली पोस्ट; म्हणाला, 'श्रेया उघड्यावर पाडेल असं वाटलं नव्हतं.'
Kushal Badrike ,Shreya Bugade : कुशल श्रेयासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
Kushal Badrike ,Shreya Bugade : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतो. 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून कुशल प्रेक्षकांच्या भेटीस येतो. या कार्यक्रमातील कुशलच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी कुशलनं किचन कल्लाकार (Kitchen Kalakar) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया बुगडे (Shreya Bugade) करते. श्रेया आणि कुशल हे चांगले मित्र आहेत. कुशल श्रेयासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. किचन कल्लाकार या कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर करून कुशलनं त्याला भन्नाट कॅप्शन दिलं आहे.
कुशलची पोस्ट
किचन कल्लाकार शोमध्ये खेकड्यांसंबंधित एक प्रश्न श्रेयानं कुशलला विचारला. या प्रश्नाला कुशलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. या कार्यक्रमामधील व्हिडीओ शेअर करून कुशलनं कॅप्शनमध्ये लिहिले, ''माझ्या बायकोला माहीत नाहीत, तेवढे माझे सिक्रेट श्रेया बुगडेला माहित आहेत त्यामुळे ती सूत्रसंचालक असलेल्या शोमध्ये जाताना काळजात धडधडत होतंच, पण शूटिंगच्या दरम्यान लक्षात आलं की माझं ते धडधडण उगाच नव्हत. सूत्रसंचालक म्हणून श्रेया किचन कल्लाकारमध्ये धुमाकूळ घालते, पण प्रत्यक्ष आयुष्यात तिचे किचनमधले प्रताप आम्ही (हवा येऊ द्या ची टीम) आवडीने चघळतो, पण सूड म्हणून ती एक दिवस आम्हाला अशी उघड्यावर पाडेल असं मात्र वाटलं नव्हतं. विशेष बाब- "या कार्यक्रमासाठी माझी खास तयारी , माझी बायको सुनयना आणि भाऊ कदम ची बायको ममता वहिनी यांनी करून घेतली त्यांनी शिकवलेल्या पदार्थांपैकी एखादी डिश मला बनवायला दिली असती तर कदाचित माझी अब्रू वाचली असती" असो...'
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी कुशलचा 'पांडू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामध्ये कुशलसोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता भाऊ कदम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :
- Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
- Jui Gadkari : जुई गडकरीची पोस्ट चर्चेत; गंभीर आजाराबद्दल दिली माहिती
- Jhund: झुंड पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअॅक्शवर बिग बींची प्रतिक्रिया; म्हणाले 'तो...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha