Prajakta Mali Not Reachable For Next 15 Days: प्राजक्ता माळी पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल, नेमकं घडलंय काय? इन्स्टा स्टोरी पाहून चाहत्यांना धक्का!
Prajakta Mali Not Reachable For Next 15 Days: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल असणार असल्याचं प्राजक्तानं सोशल मीडियावरुन सांगितलं आहे.

Prajakta Mali Not Reachable For Next 15 Days: लाखो तरुणांच्या गळ्यातली ताईत असलेली अभिनेत्री (Marathi Actress) म्हणजे, प्राजक्ता माळी (Prajakta Mali). मराठी इंडस्ट्रीतली (Marathi Entertainment Industry) लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. स्वतःबाबतचे सर्व अपडेट्स ती चाहत्यांशी थेट शेअर करत असते. आपल्या आयुष्यातील सगळे अपडेट्सही ती चाहत्यांसोबत शेअर करते. आता नुकतीच प्राजक्ता माळीनं सर्वांना सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल असणार असल्याचं प्राजक्तानं सोशल मीडियावरुन सांगितलं आहे. प्राजक्तानं सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करुन याबाबत सांगितलं आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. Bye Bye Phone for next 15 days असं म्हणत, प्राजक्तानं ही पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबतच, प्राजक्तानं स्टोरीवर एक फोटोही शेअर केला आहे. प्राजक्ताची पोस्ट पाहून तिचे चाहते काहीसे चिंतेत पडले आहेत. आता प्राजक्ता पुढचे 15 दिवस मोबाईल वापरणार नसल्याचं तिच्या पोस्टमधून स्पष्ट होत आहे. म्हणजेच, ती नॉट रिचेबल असणार आहे. अशातच प्राजक्ता नेमकी गेली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

15 दिवसांसाठी प्राजक्ता नेमकी गेलीय कुठे?
प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहत्यांशी कनेक्ट राहणारी प्राजक्ता अचानक ऑफलाइन जाणार, तेसुद्धा तब्बल 15 दिवसांसाठी हे ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. पण, प्राजक्तानं स्टोरीमध्येच शेअर केलेल्या एका फोटोवरुन स्पष्ट होतंय की, प्राजक्ता 15 दिवस का नॉट रिचेबल असणार आहे? प्राजक्ता माळी बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिविंग कोर्सला गेलीय. प्राजक्ता सध्या बंगळुरू येथे आश्रमात गेली आहे. हा आश्रम आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी स्थापन केलाय. ध्यान, योग, श्वसनक्रिया आणि मानसिक शांततेसाठी जगभरातून लोक येथे येतात. प्राजक्ताही तिथे गेली असून आता पुढचे 15 दिवस ती तिथेच असणार आहे.
प्राजक्तानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आश्रमातील प्रसिद्ध विशालाक्षी मंडपातील व्हिडीओही शेअर केला आहे. विशालाक्षी मंडप हा आश्रमातील प्रमुख ध्यानस्थळांपैकी एक मानला जातो. शांत, निसर्गरम्य आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या ठिकाणी प्राजक्ता पुढील 15 दिवस साधना आणि आत्मचिंतन करणार आहे.
दरम्यान, मराठी मनोरंजन विश्वातली लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगणा आहे. यासोबतच ती एक कवयित्री, उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे. यासोबतच सौंदर्याची खाण असलेली प्राजक्ता महाराष्ट्रभरातल्या असंख्य मुलांच्या गळ्यातील ताईत आहे. तर, अनेक तरुणींची स्टाईल आयकॉन आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























