Kushal Badrike : "हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय"; कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kushal Badrike: कुशलनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या एका हरवलेल्या वस्तूचा उल्लेख केला आहे.
Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. कुशल हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कुशल हा सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. नुकतीच एक खास पोस्ट कुशलनं शेअर केली आहे. कुशलनं या पोस्टमध्ये त्याच्या एका हरवलेल्या वस्तूचा उल्लेख केला आहे.
कुशल बद्रिकेची पोस्ट
कुशलनं त्याचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या सेल्फीला त्यानं कॅप्शन दिलं, "माझं सालं एक pen drive हरवलंय काही photos आणि videos असलेलं, तसं रोजचं वापरात नव्हतं म्हणा ते, पण हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय. आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते बघा अचानक हरवते आणि सापडता सापडत नाही, तसं काहीसं हरवलय “आठवणींनी भरलेलं…” (सुकून)" कुशलच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
कुशलनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'pen drive नवीन घेता येईल पण जुन्या आठवणी त्या कशा आणणार?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'दादा तो पेनड्राईव हरवेपर्यंतचाच सोबती होता.आठवणींचा त्रास करून घेणं वा न घेणं आपल्यावर आहे. माणसं तर ठरवून दुखावून सोडून देतात, पेनड्राईव्हची आठवण तर तुला सुखद आनंद देईल'
View this post on Instagram
कुशल हा विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. कुशलच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. रावरंभाव, पांडू या चित्रपटात देखील कुशलनं काम केलं. कुशलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. कुशल हा इन्स्टाग्रामवर विविध पोस्ट शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 348K फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: