एक्स्प्लोर

Kiran Mane: 'दादांना अश्लील म्हणून का हिणवलं गेलं...'; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

  किरण माने (Kiran Mane) यांनी पोस्टमध्ये दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या चित्रपटांचा उल्लेख केला आहे.

Kiran Mane:  अभिनेते  किरण माने (Kiran Mane) यांनी अभिनेते दादा कोंडके यांच्याबाबत नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण यांनी दादा कोंडके (Dada Kondke)  यांच्या चित्रपटांचा उल्लेख केला आहे. 'जळजळीत परखड सत्य आपल्या अनेक सिनेमांमधून सांगणाऱ्या दादांना 'अश्लील' म्हणून का हिणवलं गेलं? हे मला आजपर्यंत कळलेलं नाय दोस्तांनो!' असं या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलं आहे.

किरण माने यांनी फेसबुकवर दादा कोंडके यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिले. या कॅप्शनमध्ये त्यांनी  'राम राम गंगाराम' या चित्रपटामधील एका डायलॉगचा उल्लेख केला. किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "जळजळीत परखड सत्य आपल्या अनेक सिनेमांमधून सांगणाऱ्या दादांना 'अश्लील' म्हणून का हिणवलं गेलं हे मला आजपर्यंत कळलेलं नाय दोस्तांनो! स्पष्टच बोलू का? दादा कोंडके म्हणलं की ज्यांना फक्त 'डबल मिनिंग'चे संवाद आठवत्यात त्यांना दादा कळलेच नाहित!"

"श्रेष्ठ कलावंत तोच असतो भावांनो, जो मनोरंजन करता-करता समाजाच्या खर्‍या वेदनांना वाचा फोडतो. जनजागृतीची, समाजसुधारणेची जबाबदारी खांद्यावर घेतो. जातीधर्मापलीकडची 'मानवता' जपतो. त्या कलाकारालाच सर्वसामान्य प्रेक्षक मनापास्नं भरभरून प्रेम देतात.जसं दादांना दिलं!दादांनी आपल्या पिच्चरमधनं बिनधास्तपने सामाजिक-राजकीय भाष्य केलं त्या काळातल्या इंदिरा गांधी-संजय गांधींच्या धोरणांवर, आणीबाणीमधल्या अराजकावर सडकून आन् बेधडक टीका केली. गायवासरू हे काँग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं. त्याकाळात नोटा खाणारं वासरू आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी गाय हे दाखवणं लै खतरनाक होतं गड्याहो."

"दादा, तुमच्यासारखा एकीकडे खळखळून हसवत, दूसरीकडं अतिशय अभ्यासपूर्वक, समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवून, उघडंनागडं 'सत्य' बोलणारा एकही कलावंत आज आमच्या अवतीभवती दिसत नाही.अभिनेत्याकडं समाजभानातनं आलेली निर्भिडता आणि विद्रोह या गोष्टी अंगी असणं हे अत्यंत गरजेचं आहे, हेच बहुसंख्य कलाकारांना माहिती नाही.तुमचं आमचं जमलं' सिनेमात तुम्ही तुमच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला विचारता, "खोटं बोलूनी पोट भरतया म्हनून का रं जगायचं? माल कुनाचा कोन खातुया, किती दिस हे बघायचं??"...असो. "गेली सांगून द्यानेसरी..मानसापरास मेंढरं बरी !" हेच खरं. मिस यु दादा. 

किरण माने यांची  "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या :

Kiran Mane: 'सिंधुताई माझी माई' मालिकेत किरण माने साकारणार 'ही' भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाले, 'त्याच्या संघर्षाचंच...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget