एक्स्प्लोर
पत्रकाराला कपिल शर्माच्या अश्लिल शिव्या, त्याच्याच विरोधात तक्रार
ट्विटरवरुन प्रसारमाध्यमांना केलेली शिवीगाळ ताजी असतानाच, आता कपिलने पत्रकार विकी लालवाणी यांना शिवीगाळ केलेलं फोन संभाषण व्हायरल झालं आहे.
मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या वादांची मालिका काही थांबताना दिसत नाही. ट्विटरवरुन प्रसारमाध्यमांना केलेली शिवीगाळ ताजी असतानाच, आता कपिलने पत्रकार विकी लालवाणी यांना शिवीगाळ केलेलं फोन संभाषण व्हायरल झालं आहे.
माझ्या विरोधात नकारात्मक बातम्या का छापतो असं विचारताना कपिलचा ताबा सुटला आणि त्यानं लालवाणी यांना शिवीगाळ केली. यात लालवाणी यांच्या मुलीबद्धलही कपिलनं अपशब्द वापरले.
विकी लालवाणी हे स्पॉटबॉय या वेबसाईटचे पत्रकार आहेत.
दोनच दिवसांपूर्वी कपिलने सलमान खान निर्दोष असल्याचं सांगताना भारतातली प्रसारमाध्यमं आणि सरकारी यंत्रणा निष्फळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाईटला त्याने अश्लिल भाषेत शिवीगाळही केली होती. यानंतर आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा कांगावाही कपिलनं केला होता.
त्यानंतर कपिलने आता पत्रकार विकी लालवाणी यांना फोन करुन शिवीगाळ केली.
कपिलचीच पत्रकाराविरोधात तक्रार
दरम्यान, ट्विटरवर आणि त्यानंतर फोनवरुनही थेट शिवीगाळ करणाऱ्या कपिल शर्मानेच पत्रकार विकी लालवाणीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
कपिलने त्याची पूर्वीची मॅनेजर आणि कथित गर्लफ्रेंड प्रीती सिमोज, तिची बहीण निती सिमोज आणि पत्रकार विकी लालवाणीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
विकी लालवाणीने 25 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप कपिल शर्माने केला आहे. खंडणी न दिल्याने विकी लालवाणीने सोशल मीडियात माझ्याबद्दल खोटी आणि नकारात्मक माहिती लिहून, बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप कपिलने तक्रारीत केला आहे.
तक्रारीची कॉपी ट्विट
दुसरीकडे कपिल शर्माने पोलीस तक्रारीची प्रत ट्विटरवरही शेअर केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
क्राईम
बातम्या
Advertisement