Devmanus 2 : 'देवमाणूस 2' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; शेवट असणार उत्कंठावर्धक
Devmanus 2 : 'देवमाणूस 2' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Devmanus 2 : 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. 'देवमाणूस 2' मालिकेत येणारे नव-नवे ट्विस्ट प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत असतात. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे 'देवमाणूस 2' मालिकेचा चाहतावर्ग नाराज झाला आहे.
'देवमाणूस 2' मालिकेत अजितकुमारला अटक झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. देवमाणूस मालिकेच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत अजितला अटक झालेली असून तो खाली बसलेला दिसत आहे. अजितसोबत इन्स्पेक्टर जामकर आणि काही पोलिसदेखील दिसत आहेत.
'देवमाणूस 2' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
'देवमाणूस' या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने चाहते नाराज झाले होते. त्यानंतर 'देवमाणूस 2' मालिका येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली. 'देवमाणूस 2' ही मालिका रंजक बनवण्यासाठी अनेक पात्रांची मालिकेत एन्ट्री करण्यात आली. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
View this post on Instagram
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'देवमाणूस 2' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेच्या जागी 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सुरू होणार आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षक आता मालिकेची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या