Dharmaveer : ब्लॉकबस्टर 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
Dharmaveer : 'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे.
13 मे रोजी 'धर्मवीर' सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृह आणि 10 हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.
View this post on Instagram
आनंद दिघेंच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी उमटवली पसंतीची ठसठशीत मोहोर
हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण 'धर्मवीर'ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसून आलं. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे.
प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर होणार आहे.
संबंधित बातम्या