Dharmaveer : आनंद दिघेंच्या नावाने आणि 'धर्मवीर' सिनेमाच्या पडद्याआडून गद्दारांनी सहानभूती मिळवली; संजय सावंत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
Dharmaveer : संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी धर्मवीर सिनेमावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Dharmaveer : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरात शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्ते पदाधिकारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आनंद दिघेंच्या नावाने आणि 'धर्मवीर' सिनेमाच्या पडद्याआडून गद्दारांनी सहानभूती मिळवली, असे म्हणत जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) निशाणा साधला आहे.
धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालता. आता हा सिनेमा ओटीटीवरदेखील रिलीज झाला आहे. अशातच संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी धर्मवीर सिनेमावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरात शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्ते पदाधिकारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी धर्मवीर सिनेमावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जे कधी घडलं नाही असं धर्मवीर सिनेमात दाखवून गद्दारांनी स्वतःला सहानुभूती मिळवून घेतली. तसेच एकनाथ शिंदे यांनी स्वत: ला आनंद दिघे म्हणून घेतल्याचा आरोप संजय सावंत यांनी केला आहे.
'धर्मवीर' सिनेमात दहा टक्केच आनंद दिघे तर 90 टक्के गद्दार होते, असे म्हणत एकनाथ शिंदेवर संजय सावंत यांनी कडाडून टीका केली आहे. तसेच या सिनेमाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी स्वत: ला आनंद दिघे म्हणवून घेतल्याचा आरोप केला आहे.
संजय सावंत पुढे म्हणाले,'धर्मवीर' सिनेमात आनंद दिघे यांचे पाय धुताना दाखविण्यात आले आहे. पण असे घडलेले नाही. अस्तित्वात नसलेल्या गोष्टी 'धर्मवीर' या सिनेमाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी दाखवल्या आहेत. खरं काय आहे ते जगाला माहित आहे".
अमेय खोपकरांनीदेखील केला आरोप
'धर्मवीर' सिनेमातील एक डायलॉग काढून ओटीटीवर रिलीज करण्यात आल्याचा आरोप मनसे चित्रपट संघचनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे. अमेय खोपकरांनी सिनेमागृहात रिलीज झालेल्या सिनेमातील एका सीनचा आणि ओटीटीवर रिलीज झालेल्या सिनेमातील सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी ट्वीट केलं आहे, ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध.
संबंधित बातम्या