एक्स्प्लोर
बिग बॉस मराठी : पुनरागमनावर ऋतुजाची इन्स्टाग्राम पोस्ट
वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर गेलेली स्पर्धक ऋतुजा धर्माधिकारी स्पर्धेत परतणार करा, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई : 'मराठी बिग बॉस'च्या घरात आता नऊ स्पर्धक राहिले असून ग्रँड फिनालेसाठी जेमतेम चार आठवडे उरले आहेत. अशातच वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर गेलेली स्पर्धक ऋतुजा धर्माधिकारी स्पर्धेत परतणार करा, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
ऋतुजाने इन्स्टाग्रामवर आपल्या हाताचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'प्लास्टर गेलं, हाताच्या हालचाली सुरु. मी (बिग बॉस मराठीच्या) स्पर्धेत पुनरागमन करावं, याबाबत तुमच्या मनातील उत्सुकता मी समजू शकते. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्याइतकीच मीसुद्धा तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आतुर आहे. आशा आहे, मला ती संधी मिळेल' असं कॅप्शन ऋतुजाने व्हिडिओला दिलं आहे.
ऋतुजा धर्माधिकारीने झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत सुसल्याची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेमुळे तिचा चेहरा घराघरात लोकप्रिय झाला. बिग बॉसच्या घरात टास्क यशस्वीपणे खेळल्यामुळे अनेक वेळा तिचं कौतुकही झालं आहे.
पुष्कर जोगसाठी कॅप्टन्सी टास्क खेळताना सुशांत शेलारच्या बगिच्यातील फुलं खेचण्याच्या नादात जमिनीवर आपटून ऋतुजाला दुखापत झाली होती. हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे बिग बॉसने ऋतुजासमोर खेळ सोडून जाण्याचा पर्याय ठेवला होता. त्यावेळी घरच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या ऋतुजाने घरी जाण्याचा मार्ग निवडला.
वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडत असल्यामुळे हाताची दुखापत बरी झाल्यावर पुनरागमन करण्याचा ऑप्शन ऋतुजासमोर खुला होता. त्यामुळे एलिमिनेशनच्या महिन्याभरानंतर ती कमबॅक करण्याची चिन्हं आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोनच आठवड्यांपूर्वी अभिनेता सुशांत शेलारनेही वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बरं झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच स्पर्धेत पुन्हा सहभागी होण्याची इच्छा सुशांतने बिग बॉसकडे व्यक्त केली होती. बिग बॉसने सुशांतची इच्छा अमान्य केल्याची माहिती सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी दिली. बिग बॉसच्या आंतरराष्ट्रीय फॉर्मेटनुसार घराबाहेरील जगाच्या संपर्कात आलेला, इतर स्पर्धकांचे डावपेच पाहिलेला स्पर्धक घरात पुनरागमन करु शकत नाही, असं मांजरेकरांनी सुशांतला समजावून सांगितलं होतं. त्यामुळे ऋतुजाबाबत कोणता निर्णय घेतला जाणार, याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी (वैद्यकीय कारण), जुई गडकरी, सुशांत शेलार (वैद्यकीय कारण), त्यागराज खाडिलकर (वाईल्ड कार्ड), भूषण कडू हे नऊ स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे. मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, स्मिता गोंदकर या सात स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेले शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले हे दोघे जण सध्या घरात आहेत. काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्री हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरात आली होती. मात्र ती केवळ पाहुणी म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती. या आठवड्यात मेघा, आस्ताद, रेशम, स्मिता, शर्मिष्ठा, नंदकिशोर हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. मात्र व्होटिंग लाईन्स बंद असल्यामुळे येत्या रविवारी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
बिग बॉस : आस्ताद, मेघाला हरवत पुष्कर कर्णधार बनला
हे 'बिग बॉस मराठी'चं घर नाही, बस आहे...
बिग बॉस मराठी : अभिनेता सुशांत शेलार घराबाहेर
बर्थ डे स्पेशल : मेघा धाडेबद्दलच्या रंजक गोष्टी
'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री
बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे
राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर
बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद
रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार
बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते
बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला दमदार सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement