(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : टांझानियाचा टिकटॉक स्टार जेव्हा ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो! किली पॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
Kili Paul : एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत.
Kili Paul : सध्या सोशल मीडियावर अनेक परदेशी कलाकारांना भारतीय संस्कृती आणि इथल्या मनोरंजनाची आवड निर्माण झालेली पाहायला मिळते. अशाच स्टार्सपैकी एक आहे टांझानियाचा किली पॉल (Kili Paul). किली पॉल आणि त्याची बहीण निमा पॉल हे दोघेही भारतीय गाण्यांवर टिकटॉक व्हिडीओ बनवताना दिसतात. त्यांच्या या व्हिडीओंना सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स मिळतात. भारतातही किलीचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकत्याच एका इव्हेंट दरम्यान किली पॉल भारतात आला होता. यावेळी त्याने चक्क मराठीत ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं आहे.
एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत. यावेळी राहुलने देखील त्याला मराठी भाषेत काही ओळी शिकवल्या. यावेळी किलीने राहुल वैद्यची मदत घेत ‘जय महाराष्ट्र’ म्हटले आहे. किलीच्या या व्हिडीओला सोशल मिडीयावर प्रचंड पसंती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
किली पॉलचा राहुल वैद्यसोबतचा हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राहुल किली पॉलला मराठी शिकवताना दिसत आहे. त्याने किलीला काही ओळी शिकवल्या. ज्यात ‘माझे नाव किली पॉल असून, मी केनियावरून आलो आहे. जय महाराष्ट्र.’ यावर किली पॉल देखील म्हणतो की, ‘माझे नाव किली पॉल आहे. जय महाराष्ट्र’. किली आणि राहुलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. नेटकरीदेखील किलीचे प्रचंड कौतुक करत आहेत. भाषा येत नसताना देखील त्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता.
कोण आहे किली पॉल?
टांझानियाचा इंटरनेट सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) बॉलिवूड चित्रपट तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांची गाणी आणि डायलॉगवर नेहमी व्हिडीओ बनवताना पाहायला मिळतो. पारंपारिक मसाई ड्रेसमध्ये दिसणारी किली पॉल त्याच्या व्हिडीओंमुळे कायम चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत वेगवेगळे बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांवर व्हिडीओ बनवले आहेत. तो वेगळ्या शैलीनं भारतीयांची मनं जिंकताना दिसतो.
सध्या पॉलचे सोशल मीडियावर 23 लाख फॉलोअर्स आहे. अभिनेता आयुष्मान खुराना, गुल पनाग आणि ऋचा चड्डा सहित अनेक भारतीय कलाकार पॉलला सोशल मीडियावर फॉलो करत आहे. किलीसोबतच त्याची बहिण निमा पॉल देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असते. या दोघांच्या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा :
Viral Video : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया' ची किली पॉलला भूरळ; हूक स्टेप केली कॉपी, पाहा व्हिडीओ