Viral Video : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया' ची किली पॉलला भूरळ; हूक स्टेप केली कॉपी, पाहा व्हिडीओ
Kili Paul Viral Video : टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलने 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर अभिनेता कर्तिक आर्यन प्रमाणे डान्स केला आहे.
Trending Video : टांझानियाचा इंटरनेट स्टार किली पॉल (Kili Paul) सोशल मीडियार प्रचंड लोकप्रिय झाला आहे. भारतातही त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. किली पॉलने 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर डान्स केला आहे. किलीने कार्तिक आर्यनप्रमाणे हूकस्टेप केली आहे. किलीचा हा नवा व्हिडीओ आता चर्चेचा विषय बनला आहे. इतकंच नाही तर कार्तिक आर्यनलाही किलीचा हा डान्स आवडला आहे.
किली बॉलिवूड चित्रपट तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांची गाणी आणि डायलॉगवर नेहमी व्हिडीओ बनवतो. पारंपारिक मसाई ड्रेसमध्ये दिसणारी किली पॉल त्याच्या व्हिडीओंमुळे कायम चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत वेगवेगळे बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांवर व्हिडीओ बनवत आगळ्या वेगळ्या शैलीनं अनेक भारतीयांची मनं जिंकली आहेत.
View this post on Instagram
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओमध्ये किलीने हॉरर कॉमेडी चित्रपट भुल भुलैया चित्रपटाची भूरळ पडल्याचं दिसत आहे. किलीने या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर थिरकल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्या हुबेहुब कार्तिकची डाम्स स्टेप कॉपी केली आहे. किली पॉल यावेळी जखमी अवस्थेतही व्हिडिओ बनवताना दिसत आहे. या हल्ल्यात झालेल्या जखमेवर त्याची पट्टी व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
View this post on Instagram
किली पॉलचा हा व्हिडीओ कार्तिक आर्यनलाही आवडला असून कार्तिकने किलीचा व्हिडीओ त्यांच्या इस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत 'हा रुह बाबा नाही, किली बाबा आहे', असं कॅप्शन दिलं आहे. 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यनसोबत तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहेत. 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
अलीकडेच किली पॉलवर प्राणघातक हल्ला झाला होता. ज्यामध्ये चाकू हल्ल्यात त्याच्या हाताला दुखापत झाली होती. सध्या तो दुखापतीतून सावरला असून सोशल मीडियावर परतला आहे. किली बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 2' च्या टायटल ट्रॅकवर तिचे हुक स्टेप करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Biggest White Diamond : जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या हिऱ्याची विक्री, किंमत माहित आहे का?
- Viral Video : 'या' चिमुकल्याचा स्वॅग पाहा, झोपाळ्यावर बसण्यासाठी लावली अनोखी शक्कल
- Viral Video : वाघावर भारी पडला कुत्रा, पाहा थक्क करणारा व्हिडीओ
- Trending : जगातला सर्वाधिक महागडा उंट, सौदी अरेबियात झाला इतक्या रक्कमेला लिलाव