एक्स्प्लोर
Advertisement
'तानाजी' चित्रपटातील काजोलचा फर्स्ट लूक रिलीज; 'ही' भूमिका साकारणार
चित्रपटात अभिनेत्री काजोल कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. आता काजोलच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. स्वतः अजय देवगणने कोजोलचा या चित्रपटातील फर्स्ट लूक आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या गाथा आपण अनेकदा ऐकत असतो. अशातच आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण 'तानाजी : द अनसंग वारियर' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर घेऊन येत आहे. या चित्रपटात स्वतः अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारणार असून सैफ अली खान राजपूत मुघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एवढच नाहीतर मराठी अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री पद्मावती राव रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
अजय देवगणने या सर्व पात्रांचे फर्स्ट लूक आपलं इन्स्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर हॅन्डलवरून शेअर केले होते. अशातच या चित्रपटात अभिनेत्री काजोल कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. आता काजोलच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. स्वतः अजय देवगणने कोजोलचा या चित्रपटातील फर्स्ट लूक आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केला आहे.
अजयच्या ट्विटवरून काजोल तानाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रिलीज करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये काजोल मराठमोळ्या अंदाजात दिसून आली. काजोलच्या कपाळावरील कुंकू, नाकातील मराठमोळी नथ तिला फार शोभून दिसत आहे.
हे पोस्टर शेअर करताना अजयने लिहिलं आहे की, 'सावित्रीबाई मालुसरे - तानाजींच्या साहसाचा आधार आणि त्यांची शक्ती' चित्रपटाचा पोस्टर रिलीज करत अजयने हेदेखील सांगितले आहे की, या चित्रपटाचा ट्रेलर 19 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे.
चित्रपटातील सर्व कलाकारांचे लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि सैफ बऱ्याच वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम रावत यांनी केलं असून निर्मिती अजय देवगण आणि भूषण कुमार यांनी केली आहे. पुढिल वर्षी म्हणजे, 10 जानेवारी 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement