Akshay Kumar SUV Seized By Jammu Police: अक्षय कुमारची SUV पोलिसांकडून जप्त; जम्मूमधल्या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई
Akshay Kumar SUV Seized By Jammu Police: अभिनेता अक्षय कुमारला विमानतळावर सोडल्यानंतर परतणारी एसयूव्ही जप्त करण्यात आलीय

Akshay Kumar SUV Seized By Jammu Police: प्रसिद्ध बॉलीवूड (Bollywood News) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जम्मूला (Jammu) पोहोचला होता. पण, अभिनेत्याची जम्मू वारी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. खरंतर, ज्या कारमधून अक्षय कुमार जम्मूमधल्या कार्यक्रमस्थळी पोहोचला होता, त्या कारवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी अक्षय कुमारची एसयूव्ही कार जप्त केली.
जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या कारला काळ्या काचा होत्या. जे जम्मूमधील मोटार वाहन कायद्याच्या नियमांविरुद्ध आहे. वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा दाखला देत, तात्काळ अक्षय कुमारच्या गाडीवर कारवाई केली आहे.
जम्मूमधील वाहतूक विभागानं सांगितलं की, कायदा सर्वांसाठी समान आहे, मग तो सामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. दरम्यान, या प्रकरणावर अक्षय कुमारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
नेमकं घडलं काय?
Akshay Kumar's SUV challaned in Jammu for tinted windows pic.twitter.com/vfA4FDFCBM
— JAMMU LINKS NEWS (@JAMMULINKS) August 12, 2025
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार एका खाजगी ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी जम्मूला पोहोचला. यावेळी अक्षयनं जम्मूपर्यंत ज्या एसयूव्हीनं प्रवास केला, ती रेंज रोव्हर कार वाहतूक पोलिसांनी जप्त केली. रेंज रोव्हरच्या खिडक्यांना काळी फिल्म लावण्यात आलेली, ही बाब नियमांचं उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे पोलिसांनी थेट अक्षय कुमारची एसयूव्ही ताब्यात घेतली. दरम्यान, जम्मू पोलिसांनी केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.
अक्षय कुमार संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमात पोहोचला. त्यानं प्रवासासाठी वापरलेला रेंज रोव्हर क्रमांक CH01 AL 7766 हा आयोजकांनी भाड्यानं घेतला होता. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारनं कार्यक्रमस्थळ डोगरा चौक ते जम्मू विमानतळ असा प्रवास केला. चालक विमानतळावरून परत येत असताना, वाहतूक पोलिसांनी डोगरा चौकाजवळ गाडी थांबवली. चौकशीदरम्यान, कारच्या खिडक्यांवर निर्धारित मानकांपेक्षा जास्त काळी फिल्म लावलेली आढळली आणि पोलिसांनी गाडीवर जप्तीची कारवाई केली.
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी चालकाकडे काळी फिल्म लावण्याच्या परवानगीशी संबंधित कागदपत्रं मागितली. पण, तो कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही. त्यानंतर, नियमांनुसार कार जप्त करण्यात आली आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशन परिसरात सुपूर्द करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, कारच्या काचेवर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त काळी काच किंवा फिल्म लावण्यास मनाई आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























