एक्स्प्लोर

Kishor Kadam Gets CM Support To Save Home: '...ही शहरी एट्रोसिटीच'; अभिनेते किशोर कदमांची घर वाचवण्यासाठी फेसबुकवर पोस्ट, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना थेट आदेश सोडला

Kishor Kadam Gets CM Support To Save Home: अंधेरीतील राहतं घर धोक्यात, अभिनेते किशोर कदम यांनी तक्रार देत केली फेसबुक पोस्ट, मुख्यमंत्र्यांकडून तक्रारीची दखल, सहकार सचिव दराडेंना किशोर कदमांशी संपर्क करण्याचे आदेश.

Kishor Kadam Gets CM Support To Save Home: मराठी अभिनेते (Marathi Actor) आणि सौमित्र (Soumitra) या टोपणनावानं कविता लिहणारे किशोर कदम (Kishor Kadam) यांचं अंधेरी (Andheri News) भागातील राहतं घर धोक्यात आल्याची फेसबुक पोस्ट (Facebook Post) स्वतः किशोर कदम यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांना किशोर कदम यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.

चकालाच्या भागातील हवा महल या सोसायटीच्या पुनर्विकासात मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप किशोर कदम यांनी केला आहे. त्यांच्यासोबतच आणखी 23 सभासदांच्या घरांवरही टांगती तलवार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांना किशोर कदम यांनी मदतीचं आवाहन केलं आहे. या सर्व अनागोंदी कारभाराला सर्वस्वी सोसायटीची कमिटी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कमिटीनं सभासदांना अंधारात ठेवत महत्वाची कागदपत्रं आणि माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

नेमकं प्रकरण काय? 

मराठी अभिनेते आणि सौमित्र या टोपणनावानं कविता लिहणारे किशोर कदम यांचं अंधेरी भागातील राहतं घर धोक्यात आल्याची पोस्ट स्वत: किशोर कदम यांनी केली आहे. अंधेरी परिसरातील चकालाच्या भागातील हवा महल या सोसायटीच्या पुनर्विकासात मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप किशोर कदम यांनी केला आहे. त्यांच्यासोबतच आणखी 23 सभासदांच्या घरांवरही टांगती तलवार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांना किशोर कदम यांनी मदतीचं आवाहन केलं आहे. या सर्व अनागोंदी कारभाराला सर्वस्वी सोसायटीची कमिटी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कमिटीनं सभासदांना अंधारात ठेवत महत्वाची कागदपत्रं आणि माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी किशोर कदम यांच्या फेसबुक पोस्टवर काय रिप्लाय दिला? 

मराठी अभिनेते किशोर कदम यांना रिप्लाय देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं आहे की, "किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून, त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील..."

फेसबुक पोस्टमध्ये किशोर कदम काय म्हणालेत? 

"नमस्कार! मी किशोर कदम. गेली तीस पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते ,मंत्री ,मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे.", असं किशोर कदम म्हणाले आहेत. 

"मेजॉरिटीच्या नावा खाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये,रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.", असं किशोर कदम म्हणाले आहेत. 

"कमिटी चौकस नसेल , सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल , PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्प सारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे आमची (अंधेरी हवा मेहेल सोसायटी चाकाला मुंबई 400093) सोसायटी आहे.", असं किशोर कदम यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. 

पुढे बोलताना किशोर कदम म्हणाले आहेत की, "मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत , कायद्याला धरून आवाज उठवतात , अन्याया विरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.
एखादा सभासद जर चौकस असेल , कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील , कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा WTSAP ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क बायकॉट केले जाते , त्याच्या पासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते , त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते ,त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.मुंबई सारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत..."

"या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती ,मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यममंत्री फडणवीसजी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी , तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे. किशोर कदम. कवी सौमित्र..."; किशोर कदम म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Devendra Fadnavis on Kishor Kadam Complaint: गारवाची गाणी लिहणाऱ्या सौमित्रकडून घर वाचवण्यासाठी पोस्ट, देवेंद्र फडणवीसांनी लगेच अधिकाऱ्यांना आदेश सोडला, म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...

व्हिडीओ

Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!
Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Embed widget