Sushmita Sen : पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती सुष्मिता सेन; 'या' कारणामुळे झाला ब्रेक-अप
अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती.
Sushmita Sen : बॉलिवूड आणि क्रिकेट या दोघांच्या कनेक्शनबाबत नेहमी चर्चा होत असते. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटसोबत लग्न केलं. अनुष्का शर्मा (Anushka Sharma), गीता बसरा (Geeta Basra) आणि हेजल कीच (Hazel Keech) या अभिनेत्रींनी क्रिकेटरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) देखील एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती. पण काही कारणांमुळे त्या दोघांचा ब्रेक-अप झाला होता.
रिपोर्टनुसार, सुष्मिता ही पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमच्या (Wasim Akram) प्रेमात पडली होती. एका डान्स शोमध्ये वसीम आणि सुष्मिता यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला पण वसीमच्या संशय घेण्याच्या स्वभावामुळे सुष्मिता आणि वसीम यांचा ब्रेक-अप झाला, अशी चर्चा त्यावेळी सुरू होती. सुष्मिता आणि वसीम हे त्यांच्या नात्याबाबत बोलणे टाळत होते.
सुष्मितानं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'मला वसीम आवडत होता पण याचा अर्थ असा होत नाही की ज्या व्यक्तीसोबत मैत्री आहे त्या व्यक्तीसोबत माझे अफेअर असेल. ' तसेच वसीमनं देखील एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, 'या अफवा आहेत. मला पुन्हा लग्न करायचं नाही. सध्या मी माझ्या मुलांकडे लक्ष देत आहे.'
क्योंकि... मैं झूठ नहीं बोलता, मैं हूँ ना, नायक, बीवी नं 1 या चित्रपटामधील सुष्मिताच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सुष्मिता तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Ankit Tiwari : ‘...त्यांच्यामुळे माझ्या 3 वर्षांच्या मुलीला उपाशी राहावं लागलं’, पंचतारांकित हॉटेलवर संतापला गायक अंकित तिवारी
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर