एक्स्प्लोर

Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत

Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: मराठी भाषेवरून होणारं राजकारण आणि सक्तीसाठी होणारा हिंसाचार चुकीचा, मात्रमात्र मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, माझा कट्टावर अभिनेते सुनील शेट्टीचं रोखठोक मत

Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: मराठी भाषेवरून (Marathi Language) होणारं राजकारण (Maharashtra Politics) आणि सक्तीसाठी होणारा हिंसाचार चुकीचा आहे, असं वक्तव्य बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता सनील शेट्टीनं (Sunil Shetty) केलंय. पण, त्यासोबतच मुंबईत (Mumbai News) राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, असंही सुनील शेट्टीनं अगदी निक्षून सांगितलं आहे. 

एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) बोलताना बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं (Bollywood Actor Sunil Shetty) रोखठोक मत व्यक्त केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी बोलताना म्हणाला की, "मी खरंतर अभिनय नंतर शिकलो, पण नेहमीच वेळेवर येतो... टाईम मॅनेजमेंट स्किल्स आपोआप शिकलो... म्हणूनच मी 35 वर्ष झालीय टिकलोय... मी आज आलोय इथे... मी एबीपी माझाशी फार पूर्वीपासूनच जोडला गेलोय... नेटवर्क खूप असतात, पण फार कमी नेटवर्क परिस्थिती लक्षात घेऊन न्यूज सांगतात... मी इथे विभाचं नाव आवर्जुन घेईल, आपल्या सर्वांचं वैयक्तिक नुकसान झालंय... एबीपी म्हणजे, विभा आमच्यासाठी... ती एक अशी व्यक्ती होती, जी नेहमीच आमच्या दृष्टीकोनातून बातमी द्यायची, पण ज्यावेळी तिच्या निधनाची बातमी समजली, त्यावेळी मला खरंच असं वाटलं की, माझं वैयक्तिक नुकसान झालंय... "

माझा फिटनेस म्हणजे, नियमितपणा... : सुनील शेट्टी

वाढत्या वयात अगदी तरुणांना लाजवणाऱ्या रुपाचं सीक्रेट काय? याबाबत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, "लहानपणापासूनच खेळांची आवड आहे, मार्शल आर्ट्स लहानपणीच शिकलो अगदी पारंपरिक अंदाजात, ज्यामध्ये लाईफस्टाईल, डाएट, एकमेकांशी कसं वागावं, हेदेखील महत्त्वाचं आहे... मार्शल आर्ट्स मला हे शिकवायचं की, हे दाखवू नका की, तुम्ही कुणापेक्षा किती ताकदवान आहात, तर स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी... कदाचित यामुळेच मी हेल्थ ट्रिपवर गेलेलो... त्याचवेळी मला समजलं की, सात-आठ तास झोपल्यामुळे मला किती फायदा होतो... आपल्याला जे काही करायचंय, ते नियमितपणे आपण केलं की, तो तुमच्या डिएनएचा भाग होतो... माझा फिटनेस म्हणजे, नियमितपणा... मी सकाळी पाच वाजता उठतो, जिम जातो, व्यायाम करतो... मला कुणाशी कॉम्पिटिशन नाही करायचंय, पण मला माहितीय की, वाढत्या वयात शरीरासोबत काय होतं... मला तेच सुधारायचंय..."

मी आजही पॉलिटिकल पार्ट्या आणि बॉलिवूड पार्ट्यांपासून दूर: सुनील शेट्टी

बॉलिवूड पार्ट्यांबाबत बोलताना सुनिल शेट्टी म्हणाला की, "मी आजही पॉलिटिकल पार्ट्या आणि बॉलिवूड पार्ट्यांपासून दूर आहे... नेहमीच दूर राहिलोय... काही राजकीय व्यक्ती आहेत, जे माझे आदर्श आहेत... तसंच, मी फिल्म इंडस्ट्रीबाबतही ठरवलेलं की, त्यावेळी मी आधीच ठरवलेलं की, मी आधी लग्न करिन आणि मग फिल्म्स करिन किंवा जर मी फिल्म्स करतोय, तर मी ठरवीन की मला कधी घरी जायचंय... मी नो मॅन्स लँडकडेही नाही जात... तसंही पाकिस्तानवर माझा खूप राग आहे, पण मी माझी बॉर्डर लाईन पाळतो..."

जॅकी श्रॉफ माझ्यासाठी माझे हिरो : सुनील शेट्टी

लहानपणापासून ते अगदी इंडस्ट्रीपर्यंत जॅकी श्रॉफ यांच्यासोबतच्या प्रवासाबाबत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, "दादा (जॅकी श्रॉफ) माझ्यापेक्षा चार ते पाच वर्षांनी मोठे आहेत... त्यावेळी ते माझ्यासाठी माझे हिरो होते... मोस्ट हँडसम मॅन आय एव्हर सी...  आजही माझ्यासाठी दादा तसेच आहेत... जर तुम्ही एखाद्याला मनापासून आदर देता, त्यावेळी तसंच तुमचं त्या व्यक्तीसोबतचं नातं होतं... ज्यावेळी दादा फिल्ममध्ये गेले, त्यावेळी आम्ही त्यांच्या फिल्मची शुटिंग पाहायला गेलो... मी तेव्हा पहिल्यांदाच फिल्म पाहत होतो... त्यावेळी तेच मला म्हणायचे, तुझी पर्सनालिटी चांगलीय, तू मार्शल आर्ट्सही शिकतोय, तू फिल्म्समध्ये यायला हवं... तिथूनच सुरुवात झाली की, मला संधी मिळाली की, मी नक्की करिन काम... आज आम्हा दोघांचं नातं तसंच आहे, माझ्यासाठी तो माझा मोठा भाऊ आहे... "

"स्मृती तिच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण काळातून जातेय... मी नुकताच जेमिमाचा एक इंटरव्यू पाहिला मी, त्यात तिनं सांगितलं की, "मी लग्नासाठी काही दिवस सुट्टी घेऊन आलेले, मला पुन्हा क्रिकेट खेळायला जायचं होतं एक लीग खेळण्यासाठी... पण इथे स्मृतीला पाहून मी ठरवलं की, मी नाही जाणार... तिनं ठरवलं की, ती इथेच राहणार... याला फक्त मैत्री नाही म्हणत, याला भाईचारा म्हणतात... इंडियानं वर्ल्डकप जिंकलाय, तो या विश्वासामुळे जिंकलाय... या एकमेकांचा आधार झाल्यामुळे जिंकलाय... अशी नाती फार कमी मिळतात, पण असं जर कुणी मिळालं तर त्याला सोबत ठेवणं हे फार गरजेचं आहे...", असं सुनील शेट्टी म्हणाला. 

लग्न केल्यानंतर फिल्म करणार असं का ठरवलेलं? यावर बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, "मला माझ्या पार्टनरला इनसिक्योरिटी द्यायची नव्हती... नेहमीच तुम्ही पाहा, एखाद्या सेलिब्रिटीच्या कुटुंबात त्यांचे जे पार्टनर्स असतात, ते कुठेना कुठेतरी इनसिक्योर असतात... आपण कितीही नाही म्हटलं तरी असतेच... कारण अॅक्टर्स बाहेर असतात, त्यांच्यासोबत ग्लॅमर असतं, आसपास सुंदर मुली असतात... इनसिक्योरिटी असतेच, मला हेच द्यायचं नव्हतं... त्यावेळी मला अनेकांनी सांगितलं की, असं काही नसतं... लग्नानंतर बॉक्स ऑफिसवर परिणाम होतो, पण मला आजवरच्या कामात कळालंय की, तुमच्याकडे कॉन्टेन्ट असेल तरच बॉक्स ऑफिसवर परिणाम होतो..."

शून्यातून इंडस्ट्रीत आपलं अस्तित्व निर्माण करणारा अभिनेता

इंडस्ट्रीत काही मोजकेच अभिनेते आहेत, ज्यांनी कोणतंही पाठबळ नसताना अगदी शून्यातून इंडस्ट्रीत आपलं अस्तित्व निर्माण केलं. पडद्यावर तर सर्वांची मनं जिंकून घेतात, पण पडद्यामागचा त्यांचा संघर्षही त्यांना वेगळं बनवतो. असाच एक अभिनेता म्हणजे, बॉलिवूडचा फिटनेस फ्रिक हँडसम हंक म्हणजे, सुनील शेट्टी. एक गुणी अभिनेता, निर्माता आणि बिझनेसमन असलेल्या सुनील शेट्टीची खरी ओळख 'सुनील अण्णा' अशीच आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या सुनील शेट्टीनं आजवर तब्बल 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. आपल्या भारदस्त आवाज आणि अॅक्शननं सुनील शेट्टीनं नव्वदचं दशक गाजवलं. 

आज दिवसभर एबीपी माझावर गप्पांची मेजवणी असणार आहे. दिवसभर 'माझा महाकट्टा' या कार्यक्रमात मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. 'माझा महाकट्टा'वर विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी, सुप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांसारखे मान्यवर उपस्थित असणार आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget