RRR glimpse out: RRR ची झलक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' ची झलक असणारा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा 45 सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
RRR first glimpse out: बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' ची झलक असणारा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा 45 सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 7 जानेवारी 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आरआरआर चित्रपटातील अजय देवगण, आलिया भट्ट, जूनियर एनटीआर आणि राम चरण या कालकारांचे लूकही समोर आला होते. एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आरआरआर या पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपटाची निर्मिती DVV एंटरटेनमेंट्सच्या डी.व्ही.व्ही. दनय्या यांनी केली आहे.
आरआरआरची खास झलक
चित्रपटाची खास झलक पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 45 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये युद्ध भूमी दिसत आहे. तसेच आलिया भट, अजय देवगण आणि राम चरण हे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या चित्रपटाचे कथानक भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळावर आधारित आहे कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू या तरुणांच्या जीवनात येणारे प्रसंग या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहेत. . चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. अल्लुरी सीताराम यांच्या भूमिकेत राम चरण तर कोमाराम यांच्या भूमिकेत ज्युनियर एनटीआर दिसणार आहेत. तसेच सीता या भूमिकेत आलिया भट दिसणार आहे. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
बाहुबली नंतर एसएस राजामौली यांच्या या आरआरआर हा मल्टि स्टारर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
चित्रपटात अजयची दमदार एन्ट्री
आरआरआर चित्रपटामधील धमाकेदार एन्ट्रीचा व्हिडीओ अजय देवगणने सोशल मीडियावर शेअर केला होता 1 मिनिटाचा व्हिडीओ अजयने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.