Sonu Sood : शेजारी राहणाऱ्या मुलाच्या शिक्षणासाठी नेटकऱ्यानं मागितला मदतीचा हात; सोनू म्हणाला, 'आत वेळ आली आहे...'
नुकतीच एका नेटकऱ्यानं सोनूकडे मदत मागितली. या नेटकऱ्याला सोनूनं रिप्लाय देखील दिला.
Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अनेक लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूला मदत मागतात. नुकतीच एका नेटकऱ्यानं सोनूकडे मदत मागितली. या नेटकऱ्याला सोनूनं रिप्लाय देखील दिला.
4 एप्रिल रोजी धर्मेंद्र कुमार नावाच्या ट्विटर हँडलवर एका लहान मुलाचा फोटो ट्विट करण्यात आला होता. या ट्वीटमध्ये सोनूला टॅग देखील करण्यात आलं. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'सोनू सूद भाई मला माहीत आहे की तुम्ही एकटेच सर्वांना मदत करता. म्हणूनच मी आशेने तुमच्याकडे मदत मागत आहे. भाई प्लिज या गरिब मुलाची मदत करा. त्याला शिक्षणासाठी तुमची मदत हवी आहे. तुम्ही खूप दयाळू आणि चांगले आहात. प्लिज मदत करा. '
Time to study ❣️ https://t.co/Ccaj98h48I
— sonu sood (@SonuSood) May 7, 2022
एक महिना आधी केलेल्या या ट्वीटला सोनूनं नुकताच रिप्लाय दिला आहे. सोनूनं ट्वीटला रिप्लाय करून लिहिले, 'आता शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.' त्यानं दिलेल्या या रिप्लायवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात.'
'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो.
हेही वाचा :
- Sonu Sood : ...जेव्हा सोनू सूद स्वत: रसवंती चालवतो! व्हिडीओ होतोय व्हायरल
- Prarthana Behere : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘नेहा’ने घेतला ब्रेक, लंडनवारीमुळे प्रार्थना बेहेरेचा शूटिंगलाही टाटा!
- Dharmaveer Trailer Launch : ‘आनंद दिघे हेच खरे दबंग’, ‘धर्मवीर’च्या ट्रेलर लाँचला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सलमान खानची विशेष उपस्थिती!