एक्स्प्लोर

'लक्ष्याच्या सगळ्या भूमिका मला फॉलो केल्यासारख्या...', अशोक मामांचं वक्तव्य चाहत्यांना खटकलं, नेमकं काय घडलं?

Ashok Saraf on Lakshya: या वक्तव्यावरून अभिनेते अशोक सराफ सध्या ट्रोल होताना दिसत आहेत. तुमच्याविषयी आदर आहे पण लक्ष्यावर असं बोलायला नको होतं अशा कमेंट्स चाहते करताना दिसत आहेत.

Ashok Saraf on lakshmikant Berde: पद्मश्री पुरस्कार विजेते, महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांनी 50 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नाटक, मालिका, चित्रपट ते बॉलीवूडपर्यंत त्यांचा प्रवास सगळ्याच मराठी प्रेक्षकांना माहित आहे. अभिनेते अशोक सराफ यांचा प्रेक्षक वर्ग ही मोठा आहे. अशी ही बनवाबनवीपासून अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या विनोदी भूमिकांचे प्रेक्षकांना आजही वेड आहे. या सगळ्या प्रवासात त्यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून भूमिका केलेले अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामा या दोघांची मैत्री, त्यांनी एकत्र केलेल्या भूमिका, दोघांचा चित्रपटात असलेला वेगळा ठसा कायम चर्चेचा विषय ठरतो.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. 'मुंबई तक ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी लक्ष्याने केवळ कॉमेडीच भूमिका केल्या हा त्याचा ड्रॉबॅक असल्याचं म्हटलंय. त्याचा आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या मला फॉलो केल्यासारख्या आहेत असेही ते म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या अनेक चाहते अशोक मामांना ट्रोल करताना दिसतायत .

काय म्हणाले अशोक सराफ? 

अशोक सराफ म्हणाले, 'लक्ष्या एक अतिशय टॅलेंटेड आर्टिस्ट होता . काही काही आर्टिस्ट मी शून्यापासून सुरुवात केली .त्यातला तो एक आहे. आगा पिछा काहीच नाही . नाटकाचं बॅकग्राऊंड सिनेमाचं. घरी कोणीही अभिनय केलेला नव्हता. अशा ठिकाणाहून बारके बारके साधे साधे रोल करत मुंबईला पोहोचला. याचं नक्कीच क्रेडिट लक्षाला दिलं पाहिजे. तुम्हाला कुठलाही आधार नसताना तुम्ही हे करून दाखवता. त्याच्या सगळ्या सिनेमांमधील त्याच्या भूमिका आणि माझ्या भूमिका काढून पाहिल्या तर त्याचे सगळे रोल हे मला फॉलो केल्यासारखे आहेत. लक्ष्याने मला स्ट्रेट फॉलो केलेलं आहे . अर्थात त्याने वेगळ्या स्टाईलने केलं. त्याची स्टाईल वेगळी होती पण एकंदर टाइमिंग तेच आहे. फार लवकर गेला तो. त्याने बरच काही केलं असतं. त्याचा ड्रॉबॅक एवढाच झाला की त्यानं केवळ कॉमेडी आणि कॉमेडीच पकडून राहिला. त्याने व्हरायटी काहीच केली नाही. पण त्याने आणि मी जे जे रोल केले, जवळपास 50 चित्रपट आम्ही एकत्र केले असतील. तू कायम माझ्यासोबत सहाय्यक म्हणूनच होता. मी हिरो असेल तर तो माझा मित्र. किंवा माझा भाऊ, ड्रायव्हर ..अशा सगळ्या भूमिकांमधून त्यांनं कॉमेडी केली आहे. त्याची एक वेगळी स्टोरी आहे पिक्चरमध्ये. ' असं ते म्हणाले.

या वक्तव्यावरून अभिनेते अशोक सराफ सध्या ट्रोल होताना दिसत आहेत. तुमच्याविषयी आदर आहे पण लक्ष्यावर असं बोलायला नको होतं अशा कमेंट्स चाहते करताना दिसत आहेत. काहींनी लिहिले, आम्ही तर लक्षामुळे तुम्हाला ओळखतो. तुमचे सिनेमे पाहतो. तुम्ही हिरो असाल तर लक्ष्या सुपर हिरो होता . काहींनी पिळगावकरांसोबत राहणे जरा कमी करा असं म्हणत अशोक मामांना ट्रोल केलं आहे .

विनोदाचे उत्तम अंग असणारी अभिनेत्री कोण? 

'सिनेमा इंडस्ट्रीमध्ये बेस्ट टाइमिंग असणारी अभिनेत्री मी पाहिली ती म्हणजे रंजना. रंजनाकडे अजिबात टाइमिंग नव्हतं. तिथे आधीचे सिनेमे काढून बघा. आणि नंतर माझ्यासोबत केलेले चित्रपट काढून बघा. एका दिवशी आमचा सीन चालला होता. तिचा आणि माझा सिन होता. आणि ती एक वाक्य फार सहज बोलून गेली. ती बोलल्यानंतर मी म्हणल्यावर छान म्हणलीस ग वाक्य तू... त्यावरती म्हणाली काही नाही रे... मी खरं तर तुला कॉपी करते. असं ती म्हणाली. केवढा मोठा वाक्य आहे हे.. असं कबूल करणं.. ती खुर्ची टाकून बघत बसायची मी काय करतो. शिकण्याची एक दुर्दम्य इच्छा होती. आजकाल अनेक कलाकार आपला शॉट झाला की निघून जातात. नाटकातून एक्झिट झाली की निघून जातात . ' असे अशोक सराफ म्हणाले.

ते पुढे म्हणाले, 'मच्छिंद्र कांबळे नाटकांमध्ये पाच पाच मिनिटांचे रोल करायचा. पोलिसाचा रोल होता. फक्त दहा मिनिटांची एन्ट्री होती. पहिल्या अंकातच त्याचं काम संपलं होतं. पण तरी तो जायचं नाही सेटवरून. तो तिथे मांडी घालून बसायचा. आणि मी काय करतो हे बघत बसायचा. प्रशांत दामले तर खुलेपणाने कबूल करतो. असं अशोक सराफ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget