Sonakshi Sinha : लग्नाच्या चर्चांनंतर सोनाक्षीनं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, 'मेहेंदी, संगीत, रोका...'
‘नोटबुक’ फेम अभिनेता झहीर इकबालला (Zaheer Iqbal)सोनाक्षी ही डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
Sonakshi Sinha : बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअर आणि ब्रेकअपबाबत कायम चर्चा सुरु असते. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) लग्नाबाबत सोशल मीडियावर सुरू आहे. ‘नोटबुक’ फेम अभिनेता झहीर इकबालला (Zaheer Iqbal)सोनाक्षी ही डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. सोनाक्षीनं काही दिवसांपूर्वी तिच्या रिंगचा फोटो शेअर केला होता. तेव्हा तिनं गुपचूप साखरपुडा केला आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. आता या सर्व चर्चांवर सोनाक्षीनं प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षीनं शेअर केला व्हिडीओ
सोनाक्षीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शाहरुख खानचा ‘अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहे. तिनं या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे, 'का माझ्या लग्नाच्या मागे लागला आहात?' या व्हिडीओला सोनाक्षीनं कॅप्शन दिलं, 'मेहेंदी, संगीत, रोका सगळं काही फिक्स केलं असेल तर मला पण सांगा.'
View this post on Instagram
झहीरनं शेअर केला व्हिडीओ
झहीरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा ही फ्लॅइटमध्ये बर्गर खाताना दिसत आहे. या व्हिडीओला झहीरनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. इक्बालनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय लव्ह यू. तुला असंच प्रेम आणि आनंद कायम मिळत राहो. '2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील सोनाक्षी आणि सलमान खान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांच्या अफेअरबाबत त्यावेळी चर्चा सुरू होत्या.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :