एक्स्प्लोर

Result : निकाल काहीही येवो, निराश होऊ नका; 'हे' दिग्गजही परीक्षेत नापास पण जीवनात मात्र टॉपर

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर होणार आहे.निकालानंतर काही जण निराश होतात.त्यातून टोकाची पावलं उचलली जातात.मात्र हा निकाल आपलं संपूर्ण आयुष्य होत नाही.

Maharashtra HSC Result : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेला महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल  आज (HSC Exam Result News) जाहीर होणार आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडं राज्याचं लक्ष होतं. निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. मात्र हा निकाल आपलं संपूर्ण आयुष्य होत नाही. अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करुन आणि वेगळे प्रयोग करुन जीवनाच्या परीक्षेत टॉपवर असतात. 

दहावी बारावीत नापास झाल्यानंतरही आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या काही उदाहरणांवरुन आपण ही गोष्ट लक्षात घेऊ शकतं. मराठमोळे दिग्दर्शक, लेखक, कवी नागराज मंजुळे यांचं नाव यात मुख्यत: येतं. मंजुळे यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केलं होतं. मंजुळेंनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की,  मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर. मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी.… परीक्षा कुठलीही असो.  ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही, असं मंजुळे यांनी म्हटलं होतं. 

सैराट, फँड्री, न्यूड, अंधाधूंद, झुंड, गंगुबाई काठियावाड, रेडू यासह अनेक सिनेमात अभिनय केलेली अभिनेत्री म्हणजे छाया कदम. छाया कदम म्हणजे आपल्या सक्षम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारं एक नाव. मात्र ती देखील 12वीच्या परीक्षेत नापास झाली होती. खेळाची आवड त्यातही कबड्डीमध्ये राज्यपातळीवर मैदान गाजवणाऱ्या छाया कदम यांना देखील 12वीत अपयशाला सामोर जावं लागलं होतं. पण या अपयशानं त्या कधीही खचून गेल्या नाहीत. तर त्यावर मात करत आयुष्यात पुन्हा नव्यानं काही तरी करण्यास सज्ज झाल्या.  अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन याबाबतची माहिती दिली आहे. 12वीत नापास झाले म्हणून मी कधी टोकाचं पाऊल उचललं नाही. असं म्हणत त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे.  

छाया कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी बारावीत नापास झाले होते. पण अपयशाने खचली नाही. मला कबड्डी खेळायला लै आवडायचे. वेडीच होते कबड्डीची. त्यामुळे अभ्यास कमी आणि खेळच जास्त. त्यातच अभ्यासाचा 'खेळ' व्हायचा. स्टेट लेवल पर्यंत कबड्डी खेळले. तिथेही आयुष्याचे काही झाले नाही. मात्र अनुभव खूप आले.आज माझ करियर वेगळ्याच क्षेत्रात धावतय. आयुष्य जगायला मजा येतेय हे मात्र नक्की. सांगायचं तात्पर्य एवढच की, अभ्यास, मार्क हे सर्वस्व नाही मित्रांनो, याचा अर्थ अभ्यास करू नये अस नाही. पण मार्क कमी मिळाले म्हणून हिरमसून जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका एवढेच सांगायचे आहे. वेगवेगळी क्षेत्र आपली वाट बघत आहेत.

नागराज मंजुळे किंवा छाया कदम ही केवळ दोनच अशी नावं नाहीत जी परीक्षेत नापास झाल्यानंतर आज आपलं एक वेगळं विश्व तयार केलंय. अशी कैक नावं आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्हाला या परीक्षेत अपयश आलं तरी खचून जाऊ नका.  

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget