एक्स्प्लोर

गायक सोनू निगम, टी-सीरीजचे भूषण कुमारमधील वाद पेटला

टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांच्यावर गायक सोनू निगमनं त्रास देत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना आता भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला यांनी उत्तर दिले आहे. सोनू निगम पब्लिसिटीसाठी आरोप करत असल्याचं दिव्या यांनी म्हटल आहे.

मुंबई : सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या दहशतीचा काळा चेहरा जगासमोर येऊ लागला. याची सुरूवात झाली ती अभिनव कश्यपच्या फेसबुक पोस्टमुळे. नव्याने येणाऱ्या लोकांना वापरून कसं साईड ट्रॅक केलं जातं ते त्याने या पोस्टमधून सांगितलं. त्यानंतर अभिनेता सोनू निगमही पुढे आला. केवळ अभिनय, दिग्दर्शन याच क्षेत्रात नव्हे तर संगीत क्षेत्रातही मोठ्या कंपन्या कशा गायकांना त्रास देतात असं सांगताना जरा विवेकाने वागण्याचा सल्लाही त्याने दिला होता. अर्थात ते त्याचं पहिलं इन्स्टा लाईव्ह होतं.

या प्रकरणाला खरा रंग चढला आहे तो टी सीरीजचा सर्वेसर्वा भूषण कुमारचं नाव आल्यानंतर. सोनू निगमने आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोनूने भूषणकुमारला सज्जड दम भरला आहे. तो भरतानाच भूषणकुमार कसा आपल्याकडे गाणं म्हणवून घ्यायला आला होता. स्मिता ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांची ओळख करून दे कसं म्हणत होता हे सांगतानाच अबू सालेम आपल्याला कसा त्रास देतोय हे सांगतानाच भूषण कसा आपल्याकडे मदत मागायला आला होता हे ही सोनूने या व्हिडिओत सांगितलं. मात्र त्यानंतर त्याने आपलं शेवटचं अस्त्र काढलं ते मरिना कंवरचं. या मॉडेल अभिनेत्रीला कसा त्रास दिला गेला हे सांगतानाच सोनूने भूषणला दम भरला. माझ्या नादाला लागू नकोस अन्यथा मरिनाचा व्हिडिओ मी वाजत गाजत लोकांसमोर आणेन अशी धमकीही त्याने दिली आहे. आता भूषण काय करणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष असतानाच भूषण कुमारच्या पत्नीचा दिव्याने सोनूला एक मेसेज लिहिला आहे.

आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये दिव्या खोसला कुमार यांनी सोनूला थॅंकलेस संबोधलं आहे. यापूर्वी टी सीरीजने सोनूला कसा ब्रेक दिला हे सांगतानाच सोनू खोटं बोलत असल्याचा दावाही केला आहे. दिव्या खोसलाकुमार या गुलशन कुमार यांच्या पत्नी असून टी सीरीजच्या चेअरमनही आहेत. तरी सोनूने भूषण यांना दिलेली धमकी आणि त्यानंतर दिव्या यांचा आलेला रिप्लाय तुलनेनं सौम्य असला तरी आता भूषण आणि पर्यायाने टी सीरीज काय करणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. या वर्तुळातल्या चर्चेनुसार टी सीरीज आता सोनूवर अब्रू नुकसानी आणि धमकी दिल्याबद्दल कायदेशीर नोटिस बजावणार असल्याच कळतं. पण अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सोनूच्या या स्टेटमेंटनंतर विनोदवीर सुनील पाल, गायक अदनान सामी ही मंडळीही पुढे येऊन बोलू लागली आहेत.

सोनूवर बहिष्कार का?

सिनेमात गायलं गाणं लोकप्रिय झालं की त्या त्या गायकांना ते पुन्हा गाण्याची फर्माईश त्यांच्या लाईव्ह शोमध्ये होते. बऱ्याचदा गाणी हिट झाली की तो गायक त्याच जीवावर शो लावतो. गायकांना मिळत असलेली अमाप लोकप्रियता आणि मानधन पाहता हिंदीतल्या म्युझिक कंपन्यांनी गाण्याचे मालकी हक्क घ्यायला सुरूवात केली. त्यानंतर ती गाणी गायकांना गाता येणार नाहीत असा नियम निघाला. ही गाणी गायची असतील तर संबंधित कंपन्यांची परवानगी घेणं आवश्यक ठरू लागलं. याविरोधात संगीत क्षेत्रातले गायक, गीतकार एकत्र आले. पैकी गीतकारांना गाणं लिहिल्याचा मोबदला मिळू लागला. पण गायक उपरा राहिला. सोनू निगम, अदनान सामी आदींनी ही लढाई लढायला घेतली. सोनूचा पवित्रा पाहून हिंदीतल्या बड्या कंपन्यांनी सोनूला घेऊन गाणं करणं बंद केलं. टी सीरीजने सलमानचं हॅंगओव्हर हे सोनूनं गायलेलं गाणं रद्द करून सलमानकडून गाऊन घेतलं. त्यानंतर म्युझिक कंपन्यांच्या मक्तेदारीला सुरूवात झाली.

अदनानचंही भाष्य

सोनू निगमच्या व्हिडिओनंतर अदनान सामीही आता खुलेपणाने बोलू लागला आहे. भारतीय सिनेसंगीत क्षेत्र विशिष्ट लोकांची मक्तेदारी होते आहे. असं सांगतानाच नवे गायक, संगीतकार, अनुभवी गायक, प्रोड्युसर्स यांना आपआपलं काम करू द्या असंही तो सांगतो. या सर्व लोकांचं शोषण होत असून अनेक बडी मंडळी या सर्व लोकांना आपल्या पंखाखाली दाबून ठेवत असल्याचा उच्चारही तो करतो. हे सांगतानाच, आता हे खूप झालं. आता नवं संक्रमण येत असून त्यासाठी प्रस्थापितांना सज्ज व्हावं लागेल आणि एक पाऊल मागे जावं लागेल असंही तो सांगतो.

सोनूचे वृत्तपत्रालाही खडे बोल

सोनू निगमने पहिला व्हिडीओ केल्यानंतर खरंतर कुणीच काही बोललं नव्हतं. कारण, त्यात सोनूने कुणाचंच नाव घेतलं नव्हतं. हा व्हिडिओ आल्यानंतर मात्र एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्रात सहा लोकांची मतं आली. ही मतं सोनूच्या व्हिडिओवरची होती. यात अमान मलिक, साकेत टंडन, रोचक कोहली, जुबीन नोटियाल ही ती मंडळी होती. सोनू निगमच्या मताचं त्यांनी खंडन केलं होतं. पण त्याचं वृत्तांकन करताना वृत्तपत्राने पेड मिडियाप्रमाणे वागू नये असा सल्लाही सोनूने दिला. त्यानंतर मात्र आपलं बोलणं कसं खरं आहे हे सांगण्यासाठी त्याने भूषणकुमारच्या नावाचा उच्चार केला. त्यानंतर वादाला सुरूवात झाली.

मरीना कुंवर कोण आहे?

मरीना कुंवर ही मूळ दिल्लीची. अनेक तरुणींप्रमाणे तीही आपलं नशीब आजमायला मुंबईत आली. मुंबईत तिने काही मालिकांमध्ये काम केलं. सीआयडी, जग्गू दादा अशा काही मालिका करतानाच काही म्युझिक सॉंग्जही तिने केले होते. पण ती फार चर्चेत नव्हती ती चर्चेत आली ती मी टू मुव्हमेंटवेळी. तिने साजिद खान आणि भूषण कुमार या दोघांवरही गंभीर आरोप केले. भूषण कुमारने कसा आपला विनयभंग केला हेही तिने सांगितलं.पण ते व्हिडिओ फार पुढे आले नाहीत. सोनू निगमने आपल्या व्हिडिओत मरीनाचा उल्लेख केल्यानंतर ती जास्त प्रकाशात आली. या सगळ्या प्रकारानंतर मरीनाने ही इंडस्ट्री सोडली.

T-Seriesचे मालक भूषण कुमारांकडून सोनू निगमला त्रास, कॉमेडियन सुनील पालचा सोनू निगमला पाठिंबा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Christmas Holiday : कोकण ते नाशिक, तुळजापूर ते कोल्हापूर; नाताळची सुट्टी, पर्यटनं गजबजलीSuresh Dhas on Beed Massajog Crime : 'मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकत्व घ्यावं'Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; आदिती तटकरे म्हणतात...Devendra Fadnavis :वाल्मिक कराडचा प्रश्नावर,फडणवीस म्हणाले..कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
Embed widget