Sidharth Malhotra Post : ‘शेरशाह’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! 'ये दिल मांगे मोर' म्हणत, सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केली भावनिक पोस्ट
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला रीलिज होऊन आज (12 ऑगस्ट) दोन वर्ष पूर्ण झालं आहे.
![Sidharth Malhotra Post : ‘शेरशाह’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! 'ये दिल मांगे मोर' म्हणत, सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केली भावनिक पोस्ट Sidharth Malhotra On Shershaah 2 Years Completion Shared Emotional Post Says Yeh Dil Maange More See The Post Marathi News Sidharth Malhotra Post : ‘शेरशाह’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! 'ये दिल मांगे मोर' म्हणत, सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केली भावनिक पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/ff5d84780022afd7fdd24569fe86a0b91691846038781766_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sidharth Malhotra On Shershaah 2 Years completion : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या ‘शेरशाह’ (Shershaah) या चित्रपटाला रीलिज होऊन आज (12 ऑगस्ट) दोन वर्ष पूर्ण झालं आहे. दोन वर्षापूर्वी रीलिज झालेल्या या चित्रपटाने कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेम दिले होते. "कॅप्टन विक्रम बत्रा" ची भूमिका साकारणे ही सिद्धार्थकरता मोठा अभिमानाचा क्षण होता. आज या चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल एक अतिशय भावनिक पोस्ट सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
काय आहे पोस्ट
"शेरशाह" च्या स्मरणार्थ सिद्धार्थ मल्होत्राने भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, "आयुष्यात कधीतरीच असे क्षण येतात ज्यावेळी एखाद्या अभिनेत्याला अमर झालेल्या व्यक्तीची भूमिका करण्याची संधी मिळते आणि नेमका तसा योगायोग माझ्या आयुष्यात आला होता. "कॅप्टन विक्रम बत्रा" च्या भूमिकेने मला नव्याने जगायला शिकवले. त्यांचे जगण्यातील बारकावे, स्पष्टवक्तेपणा, देशभक्ती, देशाविषयी असणारी तळमळ या प्रत्येक गोष्टी मी शिकत गेलो आणि या प्रदीर्घ प्रवासानंतर शेरशाह तुमच्यासमोर आला. दोन वर्षापूर्वी याच दिवशी तुम्ही या चित्रपटाला खूप प्रेम दिले होते. जेव्हा जेव्हा या तारखेचा मी विचार करतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट येते ते म्हणजे "ये दिल मांगे मोर"
View this post on Instagram
चित्रपटाच्या कथानकाने जिंकलं मन!
‘शेरशाह’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने ‘कॅप्टन विक्रम बत्रा’ यांची भूमिका साकारली होती. भारतीय सैन्याचे कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धा दरम्यान भारतीय क्षेत्राचं संरक्षण केलं होतं. या युद्धात ते शहीद झाले होते. त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘परमवीरचक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना 'शेरशाह' असं म्हटलं जातं. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री कियारा अडवानी मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपटाची निर्मिती करण जोहरचं प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनने केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन होते आणि याची कथा संदीप श्रीवास्तव यांनी लिहिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Gadar 2 screening: गदर-2 च्या स्पेशल स्क्रीनिंगला नाना पाटेकर यांनी लावली हजेरी; व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)