Happy Birthday Siddhant Chaurvedi : व्हायचं होतं सीए झाला अभिनेता; 'गली बॉय' सिद्धांत आहे कोट्यवधींचा मालक
आज सिद्धांत चतुर्वेदीचा (siddhant chaturvedi) 29 वा वाढदिवस आहे.
Happy Birthday Siddhant Chaurvedi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. गली बॉय, गेहरांईया आणि बंटी और बबली या चित्रपटामधील सिद्धांतच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आज त्याचा 29 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दल खास गोष्टी...
उत्तर प्रदेशमधील बलिया येथे सिद्धांतचा जन्म झाला. सिद्धांत पाच वर्षाचा असताना त्याचे कुटुंब मुंबईमध्ये आले. सिद्धांतचे वडील हे सीए होते. त्यामुळे सिद्धांतला देखील सीए व्हायचे होते. मुंबईमधील मीठीबाई कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. सीए आर्टिकलशिप दरम्यान सिद्धांतचं कामामध्ये मन लागत नव्हतं त्यामुळे त्यानं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये फ्रेश फेस स्पर्धेत सिद्धांतनं भाग घेतला होता. या स्पर्धेत तो विजेता ठरला. 2016 मध्ये सिद्धांतनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानं 'लाइफ सही है' आणि 'इनसाइड एज' या सीरिजमध्ये काम केलं.
सिद्धांत आहे कोट्यवधींचा मालक
सिद्धांत त्याच्या कुटुंबासोबत एका लग्झरी फ्लॅटमध्ये राहतो. त्याच्याकडे Volvo XC 90 ही आलिशान गाडी आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धांतकडे एकूण 38 कोटींची संपत्ती तो एका चित्रपटासाठी एक कोटी एवढे मानधन घेतो.
View this post on Instagram
लवकरच सिद्धांतचा 'फोन भूत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धांतसोबतच कतरिना कैफ आणि ईशान खट्टर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :