एक्स्प्लोर

Secrets of Gavaskar : क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल, 'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेब सीरिजचा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Secrets of Gavaskar : ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल घेऊन 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही नवीकोरी वेब सीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे.

Secrets of Gavaskar : ओटीटी हेच भविष्य आहे असे म्हणणाऱ्या सिनेविश्वात ओटीटीचा जाळ भलताच पसरला आहे. बरेचसे मालिका विश्वातील कलाकार ही ओटीटीविश्वात काम करण्यास सज्ज झाले आहेत. क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल घेऊन 'सिक्रेट ऑफ गावस्कर' (Secrets of Gavaskar) ही नवीकोरी वेब सीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे. 'चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट' निर्मित आणि 'व्हीमास मराठी' प्रस्तुत दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि ऍक्शनचा भरणा असलेली वेब सीरिज लवकरच 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या आधी व्हीमास मराठीच्या 'राडा राडा' या टॉक शोमधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकल्या होत्या. त्यांच्या या टॉक शोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता त्यांची 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही वेब सीरिज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे. नुकताच या वेब सीरिजचा भयावह ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

मातब्बर कलाकारांची फौज

अभिनेता हरीश दुधाडे, संग्राम समेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, दीप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे या तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिका या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाची जादू या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव नक्कीच घेईल, यांत शंकाच नाही. ही वेब सीरिज लेखक अजिंक्य ठाकूर लिखित असून, याच्या संकलनाची बाजू प्राची पाठारे हिने उत्तमरीत्या साकारली आहे. तर, क्राईम सीनला कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी शिवराज सातार्डेकर याने पेलवली आहे.  

क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल

या वेब सीरिजबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस लोखंडे असे म्हणाला की, 'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेब सीरिज वेगळ्या पठडीतील असून, प्रत्येक कलाकाराने केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. या वेब सीरिजमध्ये काम केलेलं सर्वच कलाकार माझे मित्र आहेत. साऱ्या कलाकारांचा अभिनयाचा अनुभव दांडगा असल्याने साऱ्यांनीच वेब सीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे. या वेब सीरिजची कथा प्रत्येक पाचव्या मिनिटाला आपल्याला संभ्रमात पाडतेय, त्यामुळे पुढे काय होतंय याची उत्सुकता आणखीनच ताणली जातेय. या वेब सीरिजमुळे आम्ही एक वेगळा जॉनर प्रेक्षकांसमोर आणला आहे, तर माझे प्रेक्षकांना हेच आवाहन आहे की, प्रेक्षकांनी वेगळ्या जॉनरला साथ द्यावी, वेगळ्या धाटणीची ही वेब सीरिज नक्की पहा. सिक्रेट ऑफ गावस्करच सिक्रेट नेमकं काय असेल हे, तुम्हाला व्हीमास मराठीवर बघायला मिळेल.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 9 August: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
Embed widget