TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' मध्ये झळकणार मराठमोळी क्षिती जोग
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंहचा आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार सोहळा' संपन्न
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार सोहळा' नुकताच दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये संपन्न झाला. ख्यातनाम अभिनेत्री निर्मिती सावंत यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'देवा देवा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'केसरिया' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याने अनेक रेकॉर्ड केले. आता या सिनेमातील 'देवा देवा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'कार्तिकेय 2'चा ट्रेलर आऊट
'कार्तिकेय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. 'कार्तिकेय' हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.
'दिल्ली क्राईम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज
ओटीटीवरील 'दिल्ली क्राईम' या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. दिल्ली क्राईमचा पहिला सिझन हा दिल्लीमधील चर्चित निर्भया प्रकरणावर आधारित होता. आता या नव्या सिझनमधील मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ट्रेलरमध्ये शेफाली शाह दक्षिण दिल्लीच्या डीसीपी वर्तिका चतुर्वेदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील शेफालीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
'मन कस्तुरी रे' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित; अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशची प्रमुख भूमिका
नितीन केणी यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मुव्ही टॉकीज नेहमीच वेगवेगळ्या विषयाचे सिनेमा घेऊन येत असते. मुंबई मुव्ही स्टुडिओज यांनी आत्तापर्यंत मराठीत लोचा झाला रे , शेरशिवराज, मल्याळममध्ध्ये पाथम वळवू असे वेगवेगळे सिनेमा आणले आहेत. तर निर्माते नितीन केणी गदर, रुस्तम, सैराट, शेरशिवराज-स्वारी अफजलखान या यशस्वी सिनेमांनंतर ‘मन कस्तुरी रे’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘मन कस्तुरी रे’ हा सिनेमा 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चंचल मनाची प्रेम कथा असं या सिनेमा बद्दल म्हणता येईल. या पोस्टरमधून बिनधास्त श्रुती आणि तिला सांभाळणारा सिद्धांत यांची केमिस्ट्री दिसून येत आहे.
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर खिलाडी कुमारचा 'रक्षा बंधन' 'झी 5' वर होणार रिलीज
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'रक्षा बंधन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेचा होणार रक्षाबंधन विशेष भाग
'योगयोगेश्वर जय शंकर' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेचा खास रक्षाबंधन विशेष भाग होणार आहे. तर पावनीच्या भूमिकेत सृष्टी पगारे दिसणार आहे.
रशियन अभिनेत्यासोबत जमली आयुषी टिळकची जोडी, ‘पोर ब्युटीफुल’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
अभिनेता सुयश टिळकची पत्नी अभिनेत्री आयुषी टिळक पहिल्यांदाच ‘पोर ब्युटिफुल’ या म्युझिक व्हिडीओमधून आपल्या भेटीस आली आहे. ‘दादला बुलेवाला’ या गाण्याला मिळालेल्या यशानंतर सिग्नेचर ट्युन्सनं एबी एंटरटेन्मेंटच्या सहकार्यानं निर्मिती केलेल्या या म्युझिक व्हिडीओमध्ये स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेताही पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडीओमध्ये चमकत आहे.
'द कपिल शर्मा शो'चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'द कपिल शर्मा शो' या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. कपिल शर्मा,कृष्णा अभिषेक,भारती सिंह, किकू शारदा हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. आता या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.