![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Samrenu : सम्या आणि रेणूची खास केमिस्ट्री; 'समरेणू' चित्रपटातील गाणं प्रदर्शित
एका निसर्गरम्य गावात 'समरेणू' (Samrenu) चित्रपटामधील या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
![Samrenu : सम्या आणि रेणूची खास केमिस्ट्री; 'समरेणू' चित्रपटातील गाणं प्रदर्शित Samrenu movie Title Song release Samrenu : सम्या आणि रेणूची खास केमिस्ट्री; 'समरेणू' चित्रपटातील गाणं प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/966fd9b87fdc1ba932f62de2e0b17773_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Samrenu : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते 'समरेणू' (Samrenu) चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शीर्षकगीतात सम्या आणि रेणूची निखळ प्रेमकहाणी अनुभवायला मिळत आहे. एका निसर्गरम्य गावात या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
'समरेणू'चे दिग्दर्शक, लेखक महेश डोंगरे म्हणतात, "हे गाणे सम्या आणि रेणू यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून सम्या आणि रेणूचे घनिष्ठ नाते दिसत आहे. मात्र शेवटी हे नाते कोणत्या वळणावर जाते, हे चित्रपटात दिसणार आहे." समरेणू' चित्रपटामध्ये महेश डोंगरे आणि रुचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या गाण्यामध्ये रेणू आणि सम्याच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
13 मे रोजी समरेणू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'समरेणू' हे शीर्षकगीत सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायले आहे. या प्रेमगीताला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सूरज- धीरज यांचे संगीत लाभले आहे. 'समरेणू' ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची वाट उत्सुकतेने पाहात आहेत.
हेही वाचा :
- Pushpa The Rule : कोट्यवधींचा गल्ला जमवल्यानंतर ‘पुष्पा 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार शूटिंग सुरु!
- Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरावर दरोडा, दागिन्यांसह 1.41 कोटींची चोरी
- Jennifer Lopez Engagement: तब्बल 20 पुन्हा एकदा जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक एकत्र, पोस्ट शेअर करत केली एंगेजमेंटची घोषणा!
- Kaun Banega Crorepati 14 : 'केबीसी'च्या नव्या पर्वात सहभागी व्हायचंय? असं करा रजिस्ट्रेशन...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)