एक्स्प्लोर

Jennifer Lopez Engagement: तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक एकत्र, पोस्ट शेअर करत केली एंगेजमेंटची घोषणा!

Jennifer Lopez Engagement: जेनिफर लोपेझने तिच्या एंगेजमेंटची अंगठी दाखवत एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यांच्या एंगेजमेंटच्या बातमीची पुष्टी केली आहे.

Jennifer Lopez Engagement: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सर्वसामान्यांसोबतच मनोरंजन विश्वातील स्टार्सही लग्न बेडीत अडकत आहेत. बॉलिवूड स्टार्स आलिया आणि रणबीर येत्या 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर आता हॉलिवूडमधील एका स्टार कपलनेही ‘एंगेजमेंट’ केली आहे.

हॉलिवूडचे हे जोडपे दुसरे कोणी नसून अभिनेत्री जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि अभिनेता बेन ऍफ्लेक (Ben Affleck) आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेनिफर लोपेझने तिच्या एंगेजमेंटची अंगठी दाखवत एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यांच्या एंगेजमेंटच्या बातमीची पुष्टी केली आहे. तिने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना लिहिले की, ‘हे जाहीर मला खूप आनंद होतो आहे...’

पाहा पोस्ट:

मात्र, दोघांची एंगेजमेंट नेमकी केव्हा झाली याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पार्ट्या, इव्हेंट्स, रेड कार्पेट व्यतिरिक्त दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसले आहेत.

बेन आणि जेनिफर यांनी याधीही 2002 मध्ये एकमेकांना डेट केले होते. त्यावेळीही दोघांनी एंगेजमेंट केली होती. पण, ते दोन वर्षांनी दोघे वेगळे झाले होते. याआधी जेनिफरने तीन वेळा लग्न केले आहे. तिने 1997मध्ये ओझानी नोआशी लग्न केले, जे अवघ्या एका वर्षानंतर मोडले. यानंतर तिने 2001मध्ये क्रिस जडशी लग्न केले, जे दोन वर्षांनी मोडले. जेनिफरने 2004 मध्ये मार्क अँथनीसोबत तिसरे लग्न केले आणि तब्बल 10 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता पुन्हा एकदा बेन आणि जेनिफर यांनी एकत्र येत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
Embed widget