समीर वानखेडे यांच्या कामाचा पत्नी क्रांती रेडकरला अभिमान; म्हणाली...
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांची पसंती मिळवते. तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत असते.
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) तिच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांची पसंती मिळवते. तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत असते. क्रांतीचे पती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे Sameer Wankhede हे आहेत. सध्या समीर हे शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व टिमने मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. क्रांतीने इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पती समीर यांच्या कामगिरीबद्दल तिला अभिमान वाटतो असे सांगितले.
मुलाखतीमध्ये समीर यांच्या हायप्रोफाइल ड्रग रेडबाबत सांगितले, 'समीर हा मेहनती आहे. आज, तो बॉलिवूडशी संबंधित ड्रग्स प्रकरणे हाताळत आहे. म्हणूनच तो हायलाइट होत आहेत. जेव्हा तो चौकशी करत असतो किंवा ऑपरेशनवर काम करत असतो, तेव्हा मी त्याला स्पेस देते मी त्यांला कोणताही प्रश्न विचारत नाही कारण मी त्याच्या कामाचा खूप आदर करते.'
पुढे तिने सांगितले, 'तो अनेक वेळा ऐवढा व्यस्त असतो की त्याला झोपायला देखील वेळ मिळत नाही. तो फक्त 2 तासच झोपतो. जेव्हा तो एखाद्या विशिष्ट प्रकरणाबद्दल फोनवर बोलत असतो तेव्हा मी कधीही त्याचे लक्ष विचलीत होईल असे काही बोलत नाही. तो दररोज गुप्त ऑपरेशन्ससाठी काम करतो आणि त्याला त्याच्या कुटुंबासमोर या ऑपरेशन्स संबंधित काहीही उघड करण्याची परवानगी नाही. मी त्याच्या समोर कोणत्याच गोष्टीची तक्रार करत नाही. समीर अशा क्षेत्रात आहे जिथे एक मिनिटही काम न करता बसता येत नाही. मला त्याच्या कामाचा आणि त्याचा अभिमान आहे.'
समीर यांच्या मुलाखतींबाबत क्रांती म्हणाली, 'मी खूप खुष आहे की समीरने मीडियाला मुलाखती देण्यास सुरूवात केली आहे. तो कसलीही माहिती कोणाला देत नाही. मला त्याचा खूप आदर आणि अभिमान वाटतो.'