Cruise Drugs Case : ड्रग्जसाठी बिटकॉईन, डार्कनेटचा वापर; क्रूझ ड्रग्जपार्टी प्रकरणी तस्कराच्या चौकशी दरम्यान खुलासा
Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे. एनसीबीला संशय आहे की, क्रूझवर जे ड्रग्स आणण्यात आले होते. त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला आहे.
Cruise Drugs Case : शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ज्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी कोठडीची हवा खावी लागतेय. त्या प्रकरणाची व्यापी फक्त दिल्ली-मुंबईपुरती मर्यादीत नाही, तर याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. क्रूझवर पार्टीसाठी जे ड्रग्ज आणण्यात आलं होतं, त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला होता. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आर्यन खानसह एकूण 8 जणांना अटक केली आहे. यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीनं एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलंय. या तस्कराच्या चौकशीनंतर ड्रग्जसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याची माहिती मिळाली आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे. एनसीबीला संशय आहे की, क्रूझवर जे ड्रग्स आणण्यात आले होते. त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्टीचे आयोजक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
एनसीबीला माहिती मिळाली आहे की, एका प्रवाशांनं नशेत धुंद झाल्यानंतर क्रूझच्या खिडक्यांची तोडफोड केली होती, त्याला ताब्यात घेतलं होतं. एनसीबी सध्या चौकशी करत आहे की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला इथे कोणी आमंत्रित केलं होतं? तसेच आर्यनच्या मित्रांकडे सापडलेल्या ड्रग्ससाठी कोणी पैसे दिले होते?
क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या क्रूझवर छापा मारत दहाहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, काही जणांची रात्रीत चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 8 ते 10 जणांपैकी एक जण बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्याचा मुलगा देखील असल्याची माहिती आहे. यात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जरी असलं तरी आज कुणालाही कोर्टात हजर केलं जाणार नसल्याचं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. सोबतच कोणालाही अटक केली नसून तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीत काय माहिती पुढे येते आणि बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाते का? हे पाहाणं महत्त्वाचे असणार आहे. सोबतच आणखी एका अभिनेत्याची मुलगी देखील यात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Drug Case: आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूड कलाकारांचा शाहरूखला पाठिंबा