83 Trailer Release : अंगावर शहारे आणणारा '83' चा ट्रेलर प्रदर्शित; 1983च्या विश्व चषकाचा थरार
83 Trailer Release: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुचर्चित चित्रपट '83' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
83 Trailer Release: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुचर्चित चित्रपट '83' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये रणवीर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसत आहे. रणवीरच्या 83 चित्रपटामधील लूकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कबीर खान दिग्दर्शित, '83' चित्रपट भारतीय क्रिकेट संघाच्या कथेवर आधारित आहे. टीम इंडियाने 1983 मध्ये वेस्ट इंडिजला हरवून आपला पहिला विश्वचषक जिंकला. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे.
View this post on Instagram
दीपिका या चित्रपटामध्ये कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने सोशल मीडियावर 83 चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट 3D मध्ये पहायला मिळणार आहे. रणवीरने सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. 83 हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.
आता हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 83 चित्रपटासोबतच रणवीरचे तख्त, अनियन आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रणवीरच्या पद्मावत, बाजीराव मस्तानी, गली बॉय, बेफिकरे आणि दिल धडकने दो या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रणवीरने बॅण्ड बाजा बारात या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
हे ही वाचा :
Omicron : ओमिक्रॉन व्हेरियंटचा विकी-कतरिनाच्या लग्नाला फटका, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Disha Patani : दिशा पाटनीनं केली प्लास्टिक सर्जरी? व्हिडीओ पाहून चाहते अवाक्