Omicron : ओमिक्रॉन व्हेरियंटचा विकी-कतरिनाच्या लग्नाला फटका, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नसोहळ्यात गोंधळ होणार नाही याची काळजी घेत आहेत. त्यामुळेच त्यांनी वऱ्हाड्यांची संख्यादेखील कमी केली आहे.
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशातच कोरोना नवा व्हेरिअंट ओमिक्रॉन सापडला आहे. कतरिना आणि विकीचा लग्नसोहळा 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये पार पडणार आहे. वऱ्हाड्यांची यादीदेखील ठरली आहे. पण आता ओमिक्रॉनमुळे वऱ्हाड्यांच्या यादीतून काही नावे हटवली जाणार आहे.
कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नसोहळ्यात कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घेत आहे. त्यामुळेच त्यांनी वऱ्हाड्यांच्या यादीतून काही नावे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अद्याप कतरिना आणि विकीने लग्नासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांच्या लग्नाबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता दिसून येत आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लग्नसोहळा साधसुधा नसून अत्यंत शाही पद्धतीने पार पडणार आहे. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. लग्नसोहळ्यात कोणते पाहुणे हजेरी लावणार हेदेखील ठरले आहे. विकी-कतरिनाच्या लग्नात फोटो लीक होऊ नयेत म्हणून पाहुण्यांसाठी मोबाईल फोन पॉलिसी असणार आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कतरिना- विकीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! 'या' तारखेला कतरिना-विकी अडकणार विवाहबंधनात
IFFI : 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'गोदावरी' सिनेमाची भरारी
तारीख पे तारीख! Ranbir- Alia च्या लग्नाला मुहूर्त सापडेना, लग्न वर्षभराने पुढं ढकलले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha