एक्स्प्लोर

'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा..' रजनीकांत यांचा ड्रायव्हर मित्र राज बहादूर, सुपरस्टार होण्याच्या प्रवासात मोलाची साथ, कोण आहेत राज बहादूर

Rajinikanth Raj Bahadur Friendship : एका मित्रामुळं सुपरस्टार रजनीकांत यांचं आयुष्य घडायला मोलाची साथ लाभली. राज बहादूर असं रजनीकांत यांच्या मित्राचं नाव.

Rajinikanth Raj Bahadur Friendship : 'दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा'... कवी अनंत राऊत यांनी खूप सुंदर शब्दात मैत्रीची व्याख्या केली आहे. खरा दोस्त मैत्रीत जात, पात, वर्ग, भेद आजिबात पाळत नाही. आपल्या मित्रासाठी कायपण अशी भावना घेऊन निस्वार्थपणे आपल्या मित्राची साथ देत असतात. अशाच एका मित्रामुळं सुपरस्टार रजनीकांत यांचं आयुष्य घडायला मोलाची साथ लाभली. राज बहादूर असं रजनीकांत यांच्या मित्राचं नाव.
 
दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना नुकताच मानाचा दादा साहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानीत केलं गेलं. हा पुरस्कार जिंकल्यानंतर रजनीकांत यांनी हा पुरस्कार मी माझ्या मित्र बस ड्रायव्हर आणि सोबती राज बहादूर यांना समर्पित करतो, असं सांगितलं.  राज बहादूर हे ते व्यक्ति आहेत ज्यांनी माझ्यातील अभिनयाचं टॅलेंट पाहून मला चित्रपटात काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं, असं रजनीकांत यांनी सांगितलं.  राज बहादुर यांनीच रजनीकांत अर्थात शिवाजीराव गायकवाड यांना तामिळ शिकवली आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाठवलं.  

रजनीकांत यांचा प्रत्येक चाहता राज बहादुर आणि त्यांच्या मैत्रीबद्दल जाणून आहे. दोघांची मैत्री जवळपास 50 वर्ष जुनी आहे. ही मैत्री सुरु झाली ती दोघे एका बसमध्ये ड्रायव्हर आणि कंटक्टर असताना. नुकतंच राज बहादूर यांनी सांगितलं होतं की, आमची मैत्री  50 वर्ष जुनी आहे. मी रजनीकांत यांना 1970 मध्ये भेटलो. ज्यावेळी त्यांनी काम सुरु केलं होतं. मी त्यावेळी ड्रायव्हर होतो. ते आमच्या ट्रान्स्पोर्ट स्टाफ ग्रुपचे सर्वात चांगले अभिनेते होते. आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. तिथं रजनी स्टेजवर परफॉर्म करायचे, असं बहादूर यांनी सांगितलेलं. 

Rajinikanth Meets PM Modi : सुपरस्टार रजनीकांतने घेतली राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट

बहादूर यांनी सांगितलं होतं की मी त्याला चेन्नई जाण्यासाठी हट्ट केला आणि अॅक्टिंग स्कूल ज्वाईन करायला सांगितलं. त्यानं अॅक्टिंग कोर्सचे दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर इंस्टीट्यूटनं एक कार्यक्रम आयोजित केला जिथं रजनीकांतनं परफॉर्म केलं होतं. तिथं के बालाचंद्रण प्रमुख पाहुणे होते. त्यांनी कार्यक्रमानंतर रजनीजवळ येत त्याला तामिळ शिकायला सांगितलं. रजनीनं ज्यावेळी मला ही गोष्ट सांगितली त्यावेळी 'तू चिंता करु नकोस. आतापासून तू माझ्याशी फक्त तामीळमध्येच बोलायचं. त्यानंतर जे काही झालं ते तुमच्यासमोर आहे'. 

रजनीकांत यांनी देखील अनेकदा सांगितलं आहे की, राज बहादुर 400 रुपए महिन्याकाठी कमवायचे आणि प्रत्येक महिन्यात 200 रुपए मला पाठवायचे. त्यावेळी मी अॅक्टिंग स्कूलमध्ये होतो. दोन तीन वर्ष राज बहादूर यांच्या अर्ध्या पगारावर निघाले, असंही ते सांगतात.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 17 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Embed widget