Rajinikanth Film Annaatthe : रजनीकांत यांची चाहत्यांना दिवाळी भेट; 'अन्नत्थे' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
'अन्नत्थे' या चित्रपटाचा टीझर 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटांचे निर्माते बीए राजू यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
Rajinikanth Film Annaatthe : सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटाची लोक उत्सुकतेने वाट पाहात असतात. त्यांची स्टाइलमुळे आणि अभिनयामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकताच रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील रजनीकांत यांची भूमिका पाहून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'अन्नत्थे' या चित्रपटाचा टीझर 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटांचे निर्माते बीए राजू यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबतच प्रकाश राज, जगपति बाबू, वेला राममूर्ति आणि सूरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच चित्रपटात मीना, खुशबू सुंदर, नयनतारा आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्रींनी महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकण हे हैद्राबादमध्ये झाले असून काही भागाचे शूटिंग कोलकतामध्ये झाले आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता धनुष, शिवकार्तिकेयन, खुशबू सुंदर, धनंजयन, साक्षी अग्रवाल या सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून रजनीकांत यांना त्यांच्या 'अन्नत्थे' या आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 'बाशा', 'शिवाजी' आणि 'एंथिरन' या सुपर हिट चित्रपटांमधील रजनीकांत यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रजनीकांत यांना भारत सरकारने 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे. रजनीकांत यांनी अपूर्व रागंगल या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
नुकताच सुपर स्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. रजनीकांत यांनी याबद्दल ट्वीट करत चाहत्यांना माहिती दिली होती. रजनीकांत यांनी ट्वीट करत सरकारचे आभार मानले होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, "मी खूप आनंदी आहे की मी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मला हा पुरस्कार मिळेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. केबी सर (के बालाचंदर) आपल्यात नाही, यांचं मला या वेळी दु:ख होते आहे.'
Rajinikanth Meets PM Modi : सुपरस्टार रजनीकांतने घेतली राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट