Arshad Warsi Jolly LLB : पुण्यातील अपघात अन् Jolly LLBची आठवण, अर्शद वारसीचा सिनेमा आज पुन्हा चर्चेत
Arshad Warsi Jolly LLB : पुण्यातील पोर्श कारच्या अपघातानंतर बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीचा जॉली एलएलबी हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.
Arshad Warsi Jolly LLB : तुम्हाला जॉली एलएलबी (Jolly LLB) हा सिनेमा आठवतोय का? अक्षय कुमारचा नाही, तर अरशद वारसीचा (Arshad Warsi ). या सिनेमात हीट अँड रनचं प्रकरण कोर्टासमोर असतं. एका बड्या उद्योगपतीचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर गाडी चढवतो. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू होतो, पण प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेपामुळे तो अवघ्या काही मिनिटांमध्ये सुटतो.वकीलाच्या भूमिकेत असलेला अर्शद वारसी जीवाची बाजी लावून पुरावे जमा करतो, ते कोर्टासमोर ठेवतो आणि शेवटचा युक्तिवाद करतो.
त्या सिनेमातील तो युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशाच्या भूमिकेत असलेल्या सौरभ शुक्लांनी आरोपीवर गुन्ह्याची निश्चिती केली आणि शिक्षाही सुनावली. पण सध्या असाच काहीसा प्रकार महाराष्ट्राच्या विद्येच्या माहेरघरात घडलाय. या चित्रपटात चित्रपटात पैशाच्या जोरावर, पोलीस यंत्रणेच्या मदतीनं हिट अँड रन प्रकरणात आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यात यश येतं, असं दाखवण्यात आलं आहे. सध्या पुण्यातही असाच प्रकार घडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा अर्शद वारसीचा जॉली एलएलबी हा सिनेमा चर्चेत आलाय.
जॉली एलएलबी सिनेमा आणि पुणे प्रकरण
शनिवारी रात्री तीन वाजता, विनानंबरप्लेट पोर्श कारनं एका तरुण आणि तरुणीला चिरडलं. सुरुवातीला ही घटना हिट अँड रन वाटली पण गाडी चालकाची ओळख पटल्यावर मात्र बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तो कारचालक हा अल्पवयीने होताच पण तो मद्यधुंदही होता.पुण्यातील प्रसिद्ध ब्रम्हा कॉर्प या बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा . घटनास्थळी त्याला प्रत्यक्षदर्शींनी आधी चोप दिला नंतर त्याला पोलिसांकडे सोपवलं. दोघांना चिरडणाऱ्या या मुलाला अवघ्या पंधरा तासांत जामीन मिळाला. इकडे रविवारी हा अल्पवयीन मुलगा घरी परतला आणि तिकडे पुण्यातील रस्त्यांवर रोष उमटला.
हर्षद वार्सीचा जॉली एलएलबी हा देखील सिनेमा अशाच आशयाचा आहे. त्यामध्ये हर्षद वार्सी हा गरिबांच्या न्यायासाठी झटतो. त्याचप्रमाणे देशात गरिब आणि श्रीमंतांना मिळणाऱ्या न्यायावरही त्या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. सध्या पुण्यापासून दिल्लीपर्यंत या वेदांत अग्रवाल या प्रकणाची चर्चा आहे. पण तो सिनेमा आहे आणि पुण्यात घडलेली घटना ही दुर्दैवाने वस्तुस्थिती. त्यामुळे या घटनेत ज्या दोन निष्पाप जीवांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना न्याय मिळणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय.
पुण्यात नेमकं काय घडलंय?
वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना वडिलांची आलीशान पॉर्शे कार घेऊन तो गेला.पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. त्यांनंतर एका स्वीफ्ट कारला धडक दिली. कोट्यवधी रुपये किमतीच्या कारनं आणि कारचालकाच्या बेदरकारपणानं दोघांचा जीव घेतला. पुण्यातल्या ब्रह्मा कॉर्प या नामांकित बिल्डरचा तो मुलगा आहे. या घटनेमध्ये अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते दोघेही इंजिनिअर होते.