एक्स्प्लोर

Prasad Khandekar: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची छोटा शकीलने दिली सुपारी, शेवटची भेटही नाहीच; असा झाला प्रसाद खांडेकरांच्या वडिलांचा अंत 

Prasad Khandekar Father Death: सध्या संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या प्रसाद खांडेकरच्या आयुष्यात एक हृदयद्रावक प्रसंग घडला होता. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

Prasad Khandekar Father Death:  मुंबईतील अंडरवर्ल्डचं वर्चस्व हे 90च्या दशकात फार चिंतेची बाब होती. अनेक निष्पापांनी यामध्ये जीव गमावले आहेत. दाऊद इब्राहीमच्या मागावर मुंबई पोलीस आजही मागावर आहेत. पण तरीही अनेकांच्या आयुष्यात या काळाच्या जखमा या फार खोलवर झाल्या आहेत. आजही त्याची झळ मुंबईतल्या अनेक कुटुंबियांना बसतेय. यामध्ये अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या प्रसाद खांडेकरचाही (Prasad Khandekar) समावेश आहे. मुंबईतील याच अंडरवर्ल्डच्या जगामध्ये प्रसाद खांडेकरांच्या वडिलांचा अंत झाला होता. 

प्रसाद खांडेकरचे वडिल हे बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक होते. महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, प्रसाद खांडेकरांच्या वडिलांच्या हत्येला छोटा शकील जबाबदार होता. दरम्यान त्या दिवशी प्रसाद आणि त्याच्या वडिलांची शेवटची भेटही झाली नव्हती. मागील वर्षी पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्याने त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला होता. 

नेमकं काय घडलं होतं त्या रात्री?

25 वर्षांपूर्वीचा तो काळ होता. 15 एप्रिल 1999चा तो दिवस. त्या दिवशी प्रसाद आणि त्याच्या वडिलांची दिवसभर भेट झाली नव्हती. त्या भेटीसाठी तो दिवसभर फिरला देखील पण काही केल्या ती भेट झाली नाहीच तेही कायमचीच. प्रसाद घरी वडिलांची वाट पाहत होता, पण त्याच दिवशी त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी घरात आली. प्रसादच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. दरम्यान, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेल्या एका बातमीनुसार, छोटा शकीलने शिवसेना संपवण्याच्या हेतूने 1999 मध्ये काही शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येची सुपारी दिली होती एका काश्मिरी आतंकवादी संघटनेला दिली होती. यामध्ये दुर्दैवाने प्रसादच्या वडिलांचे म्हणजे महादेव खांडेकरांचेही नाव होते. गुरप्रीत सिंग उर्फ मिकी या काश्मिरी आतंकवाद्यानेच त्यांची निर्घृण हत्या केल्याचं पुढील तपासात आढळून आलं. दिल्ली पोलिसांनी 2001 मध्ये त्याला अटकही केली होती. पण यामध्ये प्रसादने त्याच्या वडिलांना वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी गमावलं. 

त्या दिवशी प्रसाद आणि त्याच्या वडिलांची भेट का झाली नाही?

महादेव खांडेकर असं प्रसादच्या वडिलांचं नाव. ते बोरीवलीत शिवसेनेच्या शाखेचे शाखाप्रमुख होते. प्रसादने अभ्यासासोबतच इतर विषयांची देखील पुस्तकं वाचावीत असं त्याच्या वडिलांना कायम वाटायचं. त्यासाठी त्यांनी बोरीवलीतील एका ग्रंथालयामध्ये त्याचं नावही टाकलं होतं. पण प्रसाद तिथून फक्त गोष्टीची पुस्तकं वाचत होतो. हि गोष्ट जेव्हा त्याच्या वडिलांना कळली तेव्हा ते त्याच्यावर रागावले आणि त्यांनी त्याला सोनेरी टोळी हे पुस्तक वाचायला सांगितलं. खूप शोधूनही प्रसादला ते पुस्तक मिळालं नाही. शेवटी अथक प्रयत्नांनी प्रसादला ते पुस्तक मिळालच. त्यामुळे आनंदित झालेल्या प्रसादला त्याच्या वडिलांना हे पुस्तक दाखवायचं होतं. बाबांना पुस्तक दाखवाचं म्हणून प्रसाद घरी गेला पण तोपर्यंत बाबा कामाला गेले होते. त्यांची दुधाची डेरी होती, बाबा कामावरुन तिथे जातील म्हणून प्रसाद तिथे गेला. 

डेरीत गेल्यावर त्याला कळलं की बाबा घरी गेलेत, म्हणून तो त्याची सायकल घेऊन घरी गेला. पण घरी गेल्यावर त्याला कळलं की बाबा शाखेत गेलेत. पण तिथेही गेल्यावर त्याच्या पदरी तेव्ह निराशाच आली. शाखेत गेल्यावर त्याला कळलं की दुसऱ्या दिवशी सेनेचा भगवा सप्ताह सुरु होणार आहे, त्यामुळे बाबा तिथे तयारीसाठी गेलेत. प्रसाद बाबांना शोधत तिथेही गेला, पण तिथे गेल्यावर त्याला कळलं की, बाबा तिथूनही घरी गेले आहेत. दिवसभर बाबांना फक्त ते पुस्तक दाखवायचं म्हणून प्रसाद सायकलीवरुन फिरत होतो, पण त्या पुस्तकात त्याच्या बाबांची गोष्ट अर्धवटच राहिली ती कायमचीच. त्या दिवशी प्रसाद आणि त्याच्या बाबांची चुकामुक व्हायची ती भेट परत कधी झालीच नाही. प्रसाद शेवटी कंटाळून घरी आला पण त्याच रात्री त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी घरात आली. 

ही बातमी वाचा : 

Naga Chaitanya Porsche Car :  नागार्जुनच्या मुलाने खरेदी केली आलिशान पोर्शे कार, कोट्यवधींची किंमत असणारी गाडी पुन्हा एकदा चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget