एक्स्प्लोर

Sharad Ponkshe: 'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी

Nasrapur Pune Child Crime: नसरापूर येथे घडलेल्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. शरद पोंक्षे यांनीही संताप व्यक्त केला.

Nasrapur Pune Child Crime Sharad Ponkshe Reaction: माणुसकीला काळिमा फासणारी घटना  पुण्यातील भोर  तालुक्यातील नसरापूर (Pune Nasrapur) येथे घडली. एका 65  वर्षीय नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला. एवढेच  नाही तर, तिची दगडाने ठेचून हत्या केली. ही  घटना उघडकीस येताच राज्यभरातून संतापाची लाट उसळली. नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत. सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,  नराधम हा पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी आता सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जातोय. अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त केला आहे. ' नराधमाला भर चौकात लोकांच्या हातात सोपवा. लोकं न्याय मिळवून देतील', अशा कडक शब्दांत त्यांनी पोस्टच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

नसरापूर येथील धक्कादायक घटना चीड आणि  संताप आणणारी आहे. 65  वर्षीय नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. नंतर  तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.    या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. सध्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,  नागरिकांच्या या मागणीने जोर धरला आहे. अभिनेते शरद पोक्षे यांनीही पोस्टच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन समर्थन दर्शवलं.  नसरापूर प्रकरणावर शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले पाहूयात.

शरद पोंक्षे यांची व्हायरल पोस्ट (Sharad Ponkshe reaction on Nasrapur case)

'नराधमाला भर चौकात लोकांच्या हातात सोपवा .लोकं न्याय मिळवून देतील,पण असं होणार नाही. गुन्हेगाराला शिक्षेची भितीच नाही. हा गुन्हेगार या आधीही असाच सुटला होता. परत तेच तेच तेच रोज घडतंय.  बलात्कार, लव जिहादच्या जाळ्यात आमच्या माता भगिनी भरडल्या जातायेत.अत्यंत असहाय्य आहोत आम्ही .सुचत नाहीये...' असं शरद पोक्षें यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.  अनेकांनी त्यांच्या फेसबूक पोस्टवर प्रतिक्रिया देत नराधमाच्या कृत्याचा संताप व्यक्त केला आहे. 

नेमकं काय घडलं?

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ही संतप्त घटना घडली.  आरोपीने आधी चिमुकलीला गोठ्यात नेले. नंतर तिच्यावर अत्याचार केला.   नराधम एवढ्यावरच थांबला नाही.  आरोपीने  चिमुकलीला दगडाने ठेचून मारलं.   नंतर नराधमाने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरलं. या संतप्त  घटनेनंतर परिसरात  संतापाची लाट उसळली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! 'मुरांबा' फेम अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमात झळकली, 'हिला' ओळखलंत का?

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget