Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pankaj Tripathi : अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले आहे.
Pankaj Tripathi Father Passed Away : 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी (Pandit Banaras Tiwari) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
पंकज त्रिपाठी आणि त्याच्या वडिलांचं नातं खूपच घट्ट होतं. वडिलांच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. करिअरसाठी पंकज मुंबईत असले तरी त्यांचं मूळ गाव बिहार आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी बिहारमधील गोपालगंज येथे अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाने ते खूप दु:खी झाले आहेत.
पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन आजाराने झाले की वृद्धापकाळाने झाले हे अद्याप समोर आले नाही. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांच्या निधनाने चाहत्यांनी मोठा धक्का बसला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते शोक व्यक्त करत आहेत. पंकज मुंबईत राहत असले तरी त्यांचे आई-वडील बिहारमधील गोपालगंज भागात राहत होते.
'मॅशेबल'ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी एकदा म्हणाले होते की,"मुलगा काय करतो, कुठे काम करतो अशा गोष्टींमध्ये माझ्या वडिलांना अजिबात रस नव्हता. तसेच मनोरंजनसृष्टीत मी नक्की काय करतो हेदेखील त्यांना माहीत नव्हतं. वडील फक्त एकदाच मुंबईत आले होते. मुंबईतील मोठ-मोठ्या बिल्डिंगमध्ये राहण्यापेक्षा त्यांना साधी राहणी पसंत होती. चांगले शिक्षण घेऊन मी डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती".
पंकज त्रिपाठींच्या 'ओएमजी 2'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला (Pankaj Tripathi OMG 2 Box Office Collection)
पंकज त्रिपाठी सध्या 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पंकज त्रिपाठीसह बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. भारतात आतापर्यंत या सिनेमाने 113.67 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 157 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पंकज त्रिपाठी यांच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) हा त्यांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच त्यांचा 'मिर्झापूर' सिनेमाच्या आगामी भागाचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या