(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut: राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याने कंगना नाराज; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...
कंगनाला थलैवी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात नामांकन होतं. कंगनाने सोशल मिडीयावर पोस्टच्या माध्यमातुन स्वतःचं दुःख मांडलंय.
Kangana Ranaut Post : कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काल म्हणजेच 24 आॅगस्ट रोजी 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अनेकांना पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे बाॅलीवूड, टाॅलीवूड , मराठी इंडस्ट्री या प्रत्येक ठिकाणहून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. तर कंगनाने देखील विजेत्यांचे कौतुक केले आहे. कंगना रनौतला थलैवी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात नामांकन होतं. मात्र कंगनाला हा पुरस्कार न मिळता आलिया भट आणि क्रिती सेनन या दोघींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर कंगनाने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून विजेच्या कलाकारांचे अभिनंदन केले आहे.
काय आहे कंगनाची पोस्ट
"National Awards 2023 च्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन. हा एक असा आर्ट कार्निव्हल आहे जो देशभरातील सर्व कलाकारांना एकत्र आणतो. माझ्या थलैवी चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही त्याबद्दल काहींना वाईट वाटले. परंतु कृष्णाने मला जे काही दिले आणि दिले नाही त्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात, माझे कौतुक करतात त्यांनीही माझ्या स्वभावाचे या वृत्तीचे कौतुक केले पाहिजे. कला व्यक्तिनिष्ठ आहे आणि मला खरोखर विश्वास आहे की ज्युरींनी त्यांचे सर्वोत्तम कार्य केले.
मी सर्वांना शुभेच्छा देते."
Congratulations to all the winners of #nationalawards2023. It is such an art carnival that brings all the artists across the country together.... It's truly magical to know and to get introduced to so much important work that's happening across all languages...
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 24, 2023
All of you who…
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याची घोषणा होण्यापूर्वी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कार श्रेणीसाठी आलिया भट्ट आणि कंगना रनौतच्या नावांची सर्वाधिक चर्चा होती. मात्र यावेळी आलियाने कंगनाला मागे टाकत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी'साठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
कंगनाला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार
कंगनाला आत्तापर्यंत अनेक चित्रपटांकरता राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी फॅशन , क्वीन , तनु वेड्स मनु रिटर्न्स , मणिकर्णिका या सिनेमांकरता पुरस्कार देण्यात आले आहेत. कंगनाला पद्मश्री पुरस्कारनेदेखील गौरविण्यात आले आहे. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कंगनाला चित्रपटांमध्ये काम मिळाले आणि ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकली.
इतर महत्वाच्या बातम्या