..आणि बघता बघता मंचावर रक्त सांडू लागलं!
तलवारबाजीवेळी पॅडीच्या बोटाला पातं लागून बोट कापलं. पण सादरीकरण करण्याच्या नादात पॅडीला काहीच कळलं नाही. हळूहळू त्यातून रक्ताचे थेंब मंचावर पडू लागले.
माणसाची दोन आयुष्य असतात असं म्हणतात. एक त्याचं व्यक्तिगत आयुष्य.. म्हणजे यात तो कुटुंबात, मुला-बाळात रमतो असं म्हणतात. त्याला खासगी आयुष्य असंही म्हणतात. तर दुसरं आयुष्य असतं ते प्रोफेशनल. म्हणजे त्याच्या उदरनिर्वाहाचं. स्त्री असो वा पुरुष या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना ही मंडळी वेगवेगळी असतात. ज्याला हे वर्गीकरण जमत नाही त्याचा बावचा होतो. पण सर्वसाधारणपणे असे दोन भाग असतात. कलावंतही त्याला अपवाद नाहीत. मंचावर चढण्यापूर्वी अत्यंत सामान्य वाटणारा कलावंत प्रकाशमान झालेल्या मंचावर चढला की तो 'तो' उरत नाही म्हणतात. कारण रंगदेवता त्याला आपल्या कवेत घेत असते. असाच काहीसा किस्सा घडला हास्य जत्रेच्या सेटवर. बघता बघता मंचावर लाल भडक रक्त सांडू लागलं.. पण त्याची तमा न बाळगता तो कलाकार सादरीकरण करत राहीला.. ते प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येईपर्यंत.
मला कळलं होतं माझ्यावर विषप्रयोग कुणी केला, पण पुरावा नव्हता : लता मंगेशकर
हा किस्सा आहे हास्यजत्रेच्या सेटवरचा. हास्यजत्रेतले कलाकार नेहमीच सर्वांना हासवत असतात. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो समीर चौघुले, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळी आदींचा. सगळीच मंडळी फार उत्तम सादरीकरण करतात. पण कधी कधी हसवता हसवता टचकन डोळ्यात पाणीही आणतात. असंच काहीसं घडलं ते एका स्किटच्या सादरीकरणावेळी. हे सादरीकरण होतं पंढरीनाथ कांबळेचं. पॅडीच्या या स्किटचा विषय होता 'युद्ध पाहिलेला माणूस' विषय तसा संवेदनशील होता. आणि कलाकार जेवढा व्यक्त होईल तितका तो विषय प्रेक्षकांपर्यंत पोचणार होता. पॅडी कांबळे आणि त्याचा साथीदार सादरीकरण करू लागले. आधी तलवारबाजी सुरू होती. याच तलवारबाजीवेळी पॅडीच्या बोटाला पातं लागून बोट कापलं. पण सादरीकरण करण्याच्या नादात पॅडीला काहीच कळलं नाही. हळूहळू त्यातून रक्ताचे थेंब मंचावर पडू लागले. हे थेंब पॅडीच्या लक्षात आले. त्याला वाटलं साथीदाराचं बोट कापलं की काय.. पण त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की हे बोट तर त्याचंच कापलं होतं. पण पॅडीने सादरीकरण थांबवलं नाही. परफॉर्मन्स चोख झाला. आणि उपस्थितांच्या डोळ्यात पाणीही आलं.
Paddy Kamble♥️♥️ मुद्दामून share करतेय हे.. जे आम्ही अनुभवले ते काल रसिकांनी अनुभवले..! तेव्हा ही रडले आणि काल ही रडले..... Posted by Vishakha Subhedar on Wednesday, 25 November 2020
हा किस्सा अभिनेत्री आणि या शोमधली कलाकार विशाखा सुभेदारने फेसबुकवर शेअर केला आहे. तिने केलेली पोस्ट अशी, Paddy Kamble♥️♥️ मुद्दामून share करतेय हे.. जे आम्ही अनुभवले ते काल रसिकांनी अनुभवले..! तेव्हा ही रडले आणि काल ही रडले.. यां अप्रतिम अनुभवाबद्दल खूप खूप धन्यवाद. काल हास्यजत्रेतील.. युद्ध पाहिलेला माणूस Prasad Khandekar♥लिहिलेले हे स्किट अनेक सर्वोत्तम प्रहसना च्या यादीत नोंदवले जाईल. ह्या बद्द्ल शंका नाही. मंडळीनो हे स्किट जेव्हा परफॉर्म होत होतं तेव्हा एक तलवार बाजीच्या moment ला पॅडीच्या हाताला लागल.. बोट कापलं गेले, पण ते त्याच्या लक्षात ही नाही आलं.. आणि आम्ही इतके मुग्ध झालो होतो की आमच्यापुढ्यातलं रक्ताचे थेंब.. (भरपूर )आम्हाला दिसलेच नाहीत..आणि त्याला लक्षात आल जेव्हा त्याने एका क्षणी खाली बघितलं..रक्ताचे थेंब दिसतायत, आपल्या सहकालाराला लागलं का?असा विचार मनात आला.. तोवर त्याच्या ध्यानी आल की हे रक्त माझ्याच हातातुन येतंय.. पण तरीही परफॉर्मन्स थांबवला नाही. आमच्याही जवळ संपता संपता आमच्या लक्षात आलं.कारण डोळ्यात फक्त आसवं होती.. त्या दिवशी भारावल्या सारखा झालं होता हास्यजत्रा चा मंच..! पॅडी समीर प्रसाद... कमाल आहात तुम्ही, i love u ऑल. हास्यजत्रा टीम ????????????????????