एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

मला कळलं होतं माझ्यावर विषप्रयोग कुणी केला, पण पुरावा नव्हता : लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर बऱ्याच वर्षांपूर्वी विषप्रयोग झाला होता. या विषयी लता मंगेशकर यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, "मला कळलं होतं माझ्यावर विषप्रयोग कुणी केलाय ते. पण आमच्याकडे पुरावा नव्हता."

मुंबई : खरंतर ही गोष्ट फार कुणाला माहित नाही. अगदी माहित असेल तर ती गेल्या पिढीतल्याच काही लोकांना माहीत असेल. कारण, ती घटना घडल्यानंतर मंगेशकर कुटुंबिय या घटनेबद्दल फार काही बोलत नाहीत. पण भारतीय सिनेसंगीताचा स्वर्गीय स्वर अर्थात गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनीच खुद्द काही गोष्टी बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत. त्या मुलाखतीनुसार लता मंगेशकर यांना फार पूर्वी विषबाधा झाली होती हे पुन्हा समोर येतं. ही बाब सांगतानाच, काही अफवांनाही त्यांनी फेटाळून लावलं आहे.

हे साल होतं 1963 चं. तेव्हा लता मंगेशकर हे नाव संपूर्ण भारताला माहित झालं होतं. त्यांच्या आवाजाची जादू सर्वदूर पसरली होती. लतादीदींना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. आणि नेमकं हे घडत असताना तो दिवस उगवला. याबद्दल बोलताना लतादिदी म्हणतात, 'ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही कोणीही मंगेशकर कुटुंबीय त्या दिवसांबद्दल फार बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती. त्यावेळी मी झोपून होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. हा प्रकार इतका भयावह होता की मला उठून चालताही यायचं नाही. मी भविष्यात चालेन की नाही असाच प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता.' लता मंगेशकर यांची तब्येत खालावली होती. साहजिकच गाणं बंद होतं. त्यामुळे त्यावेळी अनेक तर्कवितर्कांना ऊत आला होता. त्यातलीच त्यावेळची एक चर्चा होती ती, लता मंगेशकर कदाचित यापुढे कधीच गाऊ शकणार नाहीत ही. पण लता दिदींनी ती अफवा असल्याचं सांगत हा मुद्दा फेटाळून लावला. त्या म्हणतात, 'मला अशक्तपणा आला होता हे खरं आहे. पण मी गाऊच शकणार नाही असं मला कुणीही सांगितलं नव्हतं. तशी शक्यताही नव्हती. त्यावेळी आमचे फॅमिली डॉक्टर होते आर.पी. कपूर. त्यांनी माझी खूपच काळजी घेतली. उलट मी कधी एकदा स्वत:च्या पायावर उभी राहतेय असं त्यांना झालं होतं. खरंतर त्यांचे आभार आहेत.' हा विषप्रयोग झाल्यानंतर पुढचे तीन दिवस लता मंगेशकर पूर्णत: बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यानंतर हळूहळू त्या यातून सावरल्या.

लता मंगेशकर यांनी त्यानंतर काही काळ आराम केला. त्यांना गायचं तर होतं. पण रेकॉर्डिंग करावं की नाही असा विषय होता. त्यावेळी त्यांच्या घरी आले ते गायक-संगीतकार हेमंतकुमार. त्यांच्या एका चित्रपटासाठी लतादिदींनी गावं असा त्यांचा आग्रह होता. ही आठवणही लतादिदी सांगतात. 'त्यावेळी हेमंत कुमार आमच्या घरी आले. त्यांना एका गाण्याचं रेकॉर्डिंग करायचं होतं. पण मी गावं की नाही असा संभ्रम होता. हेमंतदा माझ्या आईला भेटले. आईने परवानगी दिली पण एका अटीवर. मी गाताना मला आवाजाला जराही ताण येतोय वा कोणताही त्रास होतोय असं जाणवलं तर मला तडक घरी सोडलं जाील अशी ग्वाहीच हेमंत कुमार यांनी दिली. त्यानंतर मी रेकॉर्डिंगला गेले. या आजारातून उठल्यावर मी पहिलं गाणं गायले ते 'कही दीप जले कही दिल' हे 'बीस साल बाद'मधलं गाणं. त्यानंतर मात्र मला फार त्रास झाला नाही.'

त्यावेळी झालेल्या उपचारात लता दिदींना विषबाधा झालीय हे निष्पन्न झालं होतं. यातल्या उपचारासाठी लतादिदी थोडे थोडके नव्हे तर तब्बल तीन महिने गादीला खिळून होत्या. पण त्यातून बाहेर यायची त्यांची जिद्द आणि योग्य वैद्यकीय उपचारांनी ते शक्य करुन दाखवलं.

यावेळी मजरुह सुलतानपुरी यांची आठवण मात्र त्या आवर्जून काढतात. लता दिदी आजारी आहेत हे कळल्यानंतर मजरुह सुलतानपुरी रोज सायंकाळी लताबाईंच्या घरी जात. 'मजरुह साब त्यावेळी कमालीचे व्यग्र होते. त्यांना पुरेशी झोपही मिळत नसे. पण त्यातून वेळात वेळ काढून मजरुह साब रोज मला भेटायला यायचे. मला कविता ऐकवत असत. त्यामुळे मला जरा बरं वाटत होतं. मजरुह साब यांनी माझी खूपच विचारपूस केली. बऱ्याचदा माझ्यासाठी मला पचेल असं जेवणही ते घेऊन यायचे.'

हा विषप्रयोग कुणी केला होता? या मुलाखतीच्या शेवटी अर्थातच ही विषबाधा कुणामुळे झाली होती हा प्रश्न येतोच. त्यावेळी लतादिदींनी दिलेलं उत्तर ऐकून थक्क व्हायला होतं. त्या म्हणतात, 'माझ्यावर झालेला विषप्रयोग नेमका कुणी केलाय ते आम्हाला कळलंच. पण त्याच्याविरोधात आम्ही काही अॅक्शन घेतली नाही. कारण आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी माणसाच्या अशा वागण्याचं नवल वाटलं होतं हे नक्की.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Embed widget