एक्स्प्लोर

'माझे तुकडे तुकडे व्हतील गं...' ; प्रथमेश परबच्या 'एक नंबर' चित्रपटातील गाणं रिलीज

'एक नंबर...सुपर' (Number one super) या आगामी मराठी चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

Number One Super film Song : हिंदी सिनेसृष्टीत स्थिरस्थावर होऊ पाहणारी अर्मेनियन डान्सर एलेना दुर्गारियनची पावलंही मराठीच्या दिशेनं वळली आहेत. पदार्पणातच ती 'एक नंबर' या गाण्यातून   प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'एक नंबर...सुपर' (Number one super) या आगामी मराठी चित्रपटात प्रथमेश परबसोबत (Prathamesh Parab) एलेनाचा धमाल डान्स परफॅार्मंस पहायला मिळणार आहे.

लक्ष वेधून घेत उत्सुकता वाढवणारं 'एक नंबर...सुपर' असं टायटल असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार असून, एलेनासोबत नाचतानाही दिसणार आहे. 'एक नंबर...सुपर' या चित्रपटातील 'माझे तुकडे तुकडे व्हतील गं...' असा मुखडा असलेल्या गाण्यावर एलेना आणि प्रथमेशचे धडाकेबाज परफॅार्मंस प्रेक्षकांना पहायला मिळणार असून राहुल संजीर यांनी कोरिओग्राफी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं एलेनानं प्रथमच मराठी चित्रपटात काम केलं आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी एलेनाला मराठीत आणण्याची किमया साधली आहे. एलेना-प्रथमेशवर शूट करण्यात आलेलं गाणं गीतकार जय अत्रे यांनी लिहिलं असून, वरुण लिखते, मुग्धा कऱ्हाडे आणि कविता राम यांनी गायलं आहे. वरुण यांनीच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे. एलेना ही रशियातील प्रसिद्ध डान्सर आहे. परदेशासोबतच भारतातही तिचे खूप चाहते आहेत. जबरदस्त लुक, आकर्षक डान्स, लक्षवेधी देहबोली, गोड स्मित, हॉट व्यक्तिमत्व आणि अनोख्या नृत्यशैलीसाठी एलेना यु ट्यूबवर खूप पॅाप्युलर आहे. 'एक नंबर...सुपर' चित्रपटातील गाण्यात प्रथमेशसोबत तिच्या डान्सचा जलवा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'एक नंबर...सुपर' मधील 'बाबूराव झाला...' हे गाणं यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, आता 'माझे तुकडे तुकडे व्हतील गं...' हे गाणं धमाल करण्यासाठी सज्ज झालं आहे. या गाण्यासाठी एलेनाची निवड करण्याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, मला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यायला आवडतं. 'माझे तुकडे तुकडे व्हतील गं...' या गाण्यासाठी एलेनाची निवडही याच विचारातून करण्यात आली आहे. या निमित्तानं आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एका पॅाप्युलर डान्सरची मराठी सिनेसृष्टीत एंट्री झाली आहे. वरुण यांनी लिहिलेलं गाणं खूप सुंदर असून, त्यावर बांधलेली चाल त्याही पेक्षा सुरेख असून अबालवृद्धांना थिरकायला लावणारी आहे. नेहमीप्रमाणे  'एक नंबर...सुपर'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.

दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मिलिंद कवडे यांनीच चित्रपटाची कथा व पटकथाही लिहिली असून, संजय नवगिरे यांनी संवादलेखन केलं आहे. या प्रथमेशसोबत मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, प्रणव पटेल यांनी संकलन केलं आहे. संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी पटकथा सहाय्यक म्हणून काम पाहिलं असून, हजरत शेख (वली) यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
Embed widget