एक्स्प्लोर
दबंग 3 च्या कमाईपेक्षा नागरिकता कायद्याविरोधी आंदोलन महत्वाचं : सोनाक्षी सिन्हा
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर स्टारर सिनेमा दबंग-3 नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होती. दबंग आणि दबंग-2 ला प्रेक्षकांनी चांगली पंसती दिली होती, त्यामुळे दबंग-3 ची सर्वांना उत्सुकता होती.
मुंबई: देशात सध्या सुरु असलेली नागरिकता सुधारणा कायद्याची चर्चा ही दबंग 3 च्या ओपनिंग डे च्या कमाईपेक्षा जास्त महत्वाची आहे, असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने म्हटलं आहे. सोनाक्षीने म्हटलं आहे की, आपण पाहतोय आज देशात काय सुरु आहे. माझं असं मत आहे की देशातील लोकांसाठी महत्वाचं काय आहे हे त्यांना चांगलंच कळतं. मी प्रामाणिकपणे सांगते की, दबंग 3 बाबत चाहत्यांच्या प्रेमाने मी खूप खुश आहे. मात्र यावेळी संपूर्ण देश नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात एकत्र आला आहे. आणि माझ्यासाठी हा मुद्दा चित्रपटापेक्षा अधिक महत्वाचा आहे, असे सोनाक्षीने म्हटलं आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर स्टारर सिनेमा दबंग-3 नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होती. दबंग आणि दबंग-2 ला प्रेक्षकांनी चांगली पंसती दिली होती, त्यामुळे दबंग-3 ची सर्वांना उत्सुकता होती. मात्र सिनेमाला हवी तशी ओपनिंग मिळाली नसल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट झालं आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेला गदारोळ या सर्वासाठी कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनाचा फटका दबंग -3 ला बसेल, असा अंदाज सिनेसृष्टीतील तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता.
हेही वाचा - Dabangg-3 | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनांचा दबंग-3 ला फटका
दबंग-3 सिनेमाला 24.50 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. दबंगच्या पहिल्या दोन सिनेमांपेक्षा ही ओपनिंग अधिक आहे, मात्र सर्वांचा यापेक्षा जास्त अपेक्षा होती. 2010 साली रिलीज झालेल्या दबंग सिनेमाला 14.50 कोटींची ओपनिंग मिळाली होती. त र 2012 साली आलेल्या दबंग-2 सिनेमाला 21.10 कोटींची ओपनिंग मिळाली होती. त्यामुळे दबंग-3 ला तुलनेने यापेक्षा चांगली ओपनिंग मिळेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र तसं झालेलं दिसत नाही.
2019 मध्ये ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा
दबंग-3 रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. यामध्ये पहिल्या नंबरवर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'स्टार' सिनेमा पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर सलमानचा भारत सिनेमा आहेत. तर तिसऱ्या स्थानावर मिशन मंगल आहे. वॉरने पहिल्याच दिवशी 53.35 कोटींची कमाई केली होती. भारतने 42.30 कोटींची कमाई केली होती. तर मिशन मंगलने 29.16 कोटींची कमाई केली होती.
दबंग सिनेमाचं बजेट जवळपास 100 कोटी रुपये आहे. या आठवड्यात सलमानच्या दबंग-3 ला टक्कर देण्यासाठी एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मात्र पुढच्या आठवड्यात अक्षय कुमार, करिना कपूरचा गुड न्यूज सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे गुड न्यूज सिनेमाचा परिणाम दबंग-3 वर निश्चित पडू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement