'ही' अभिनेत्री साकारणार स्वामिनी मालिकेत रमाबाईंची भूमिका
कलर्स मराठी वरील 'स्वामिनी' मालिकेतही असेच महत्त्वाचे बदल झाले आहेत. मालिकेत सृष्टी पगारे ही बालकलाकार छोट्या रमाबाईंची मुख्य भूमिका साकारतेय पण आता बालकलाकारांना चित्रीकरणास परवानगी नाही म्हणून स्वामिनी मालिकेतील शनिवारवाडा आता मोठ्या रमेच्या पावलांनी उजळणार आहे.
मुंबई : शासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करत छोट्या पडद्यावरील सगळ्या मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या नियमांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बालकलाकार आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरण करण्यास मनाई आहे. त्यामुळे अनेक मालिकांमध्ये ज्येष्ठ आणि बालकलाकार साकारत असलेल्या भूमिकांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. काही कलाकारांना रिप्लेस केलं गेलं आहे तर काही पात्र मालिकेतून तात्पुरती गायब केली आहेत.
कलर्स मराठी वरील 'स्वामिनी' मालिकेतही असेच महत्त्वाचे बदल झाले आहेत. मालिकेत सृष्टी पगारे ही बालकलाकार छोट्या रमाबाईंची मुख्य भूमिका साकारतेय पण आता बालकलाकारांना चित्रीकरणास परवानगी नाही म्हणून स्वामिनी मालिकेतील शनिवारवाडा आता मोठ्या रमेच्या पावलांनी उजळणार आहे.
मोठ्या रमा बाईंची भूमिका अभिनेत्री रेवती लेले साकारणार आहे. रेवती ही एक उत्तम अभिनेत्री तसच उत्तम डान्सरही आहे. रेवतीची देखील प्रमुख भूमिका म्हणून हि पहिलीच मालिका असल्यानं ती या मालिकेसाठी उत्साही आहे. त्यामुळे आता रमा-माधव यांचा पुढचा प्रवास कसा आसणार, गृह कलह, घरातील राजकारण होत असतानाच रमाबाई पेशवाईचा भार कसा सांभाळला, शनिवार वाड्यात मोठ्या रमेला कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावं लागणार हे सगळं आता मालिकेच्या नविन भगांमध्ये पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या :